संरक्षण मंत्रालय
G20 THINQ प्रश्नमंजुषा राष्ट्रीय उपांत्य फेरीचा समारोप, आठ उत्कृष्ट संघ अंतिम फेरीसाठी पात्र
18 नोव्हेंबर 23 रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे राष्ट्रीय अंतिम फेरी होणार
Posted On:
17 NOV 2023 7:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023
भारतीय नौदल आणि एनडब्ल्यूडब्लूए (नेव्ही वेल्फेअर अँड वेलनेस असोसिएशन) गेल्या अनेक वर्षांपासून नौदल सप्ताह उपक्रमांचा एक भाग म्हणून शालेय मुलांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करत आहेत. प्रतिष्ठित जी 20 च्या भारताच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने, जी 20 सचिवालयाकडून वर्षभरात मिळालेले सहकार्य आणि पाठबळाच्या आधारे “भारतीय नौदल – THINQ प्रश्नमंजुषा” 2023 च्या माध्यमातून हा उपक्रम जागतिक स्तरावर पोहोचला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला जी 20 THINQ असेही संबोधले जात आहे.
या प्रश्नमंजुषेची राष्ट्रीय उपांत्य फेरी 17 नोव्हेंबर 2023 रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए ), मुंबई येथे झाल्यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धा एका उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे
उपांत्य फेरीच्या दोन फेऱ्यांमधून मोठा प्रवास केल्यानंतर, खालील आठ शाळा अंतिम संघ म्हणून निवडण्यात आल्या आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
1. नेव्ही चिल्ड्रन्स स्कुल , मुंबई
2. कृष्णा पब्लिक स्कूल, रायपूर
3. जीडी गोयंका पब्लिक स्कूल, सिलीगुडी
4. दिल्ली पब्लिक स्कूल, भोपाळ
5. भवन्स विद्या मंदिर, कोची
6. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर
7. डीएव्ही पब्लिक स्कूल, गुरुग्राम
8. जीएमएचएसएस कालिकत विद्यापीठ परिसर, मलप्पुरम
18 नोव्हेंबर 2023 रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे हे निपुण संघ आता बौद्धिक देवाणघेवाण आणि स्पर्धा म्हणून राष्ट्रीय अंतिम फेरीमध्ये वर्चस्वासाठी लढतील. राष्ट्रीय फेरी पूर्ण झाल्यावर, 23 नोव्हेंबर 2023 रोजी इंडिया गेट, नवी दिल्ली येथे होणार्या आंतरराष्ट्रीय फेरीत भाग घेण्यासाठी "टीम इंडिया" तयार करण्यासाठी सर्व अंतिम स्पर्धकांमधून परीक्षक प्रश्नमंजुषेतील दोन सर्वोत्तम स्पर्धक निवडतील.


N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1977732)