सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी 42 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2023 मध्ये “एमएसएमई दालनाचे " चे केले उद्घाटन
Posted On:
16 NOV 2023 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2023
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांनी आज 42 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) मंत्रालय आणि अंतर्गत येणाऱ्या संघटनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत “एमएसएमई दालनाचे ” चे उद्घाटन केले. नवी दिल्लीतल्या प्रगती मैदान येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या कक्ष क्रमांक 4 मध्ये हे एमएसएमई दालन उभारण्यात आले आहे.


या वर्षीच्या 42 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (IITF) उभारण्यात आलेल्या एमएसएमई दालनामध्ये “पीएम विश्वकर्मा” योजनेवर आधारित संकल्पना मांडण्यात आली आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाशी संबंधित ही प्रमुख योजना 17.09.2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती.

पारंपारिक कारागीर आणि शिल्पकार यांचे महत्त्व अधोरेखित करून, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, ज्यांना परंपरागतपणे आपण‘विश्वकर्मा’ संबोधतो, ते विश्वकर्मा खऱ्या अर्थाने या देशाचे निर्माते आहेत.
या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले की, हा मेळावा एमएसएमई उद्योजकांना, विशेषत: महिलांना, अनुसूचित जाती/जमाती आणि आकांक्षी जिल्ह्यातील उद्योजकांना आपली कला कौशल्ये/उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करेल आणि या माध्यमातून त्यांच्या विकासासाठी नवनव्या संधी निर्माण होतील.
यावेळी प्रथमच सहभागी होणाऱ्या कारागिरांना 85% पेक्षा जास्त स्टॉल्सचे वाटप करण्यात आले. 64 एमएसई उद्योगांनी देशातील आकांक्षी जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व केले. 66% स्टॉल्स महिला उद्योजकांना आणि 55% स्टॉल्स हे अनुसूचित जाती जमातीच्या उद्योगांना मोफत वाटप करण्यात आले. या दालनामध्ये 29 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व आहे.

यावेळी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी एमएसएमई दालनात विविध एमएसएमई प्रदर्शकांची भेट घेतली, या ठिकाणी एमएसएमई उद्योजकांनी वस्त्रे, हातमाग, भरतकाम, हस्तकला, रत्ने आणि आभूषणे , चामड्याची पादत्राणे , खेळ आणि खेळणी, बांबू,वेतापासून निर्माण केलेल्या वस्तू, फर्निचर, सिरॅमिक्स आणि मातीची भांडी, खाद्य उत्पादने, सौंदर्य प्रसाधने, रासायनिक उत्पादने, यांत्रिक वस्तू यासह विविध क्षेत्रातील उत्पादनांचे प्रदर्शन भरवले आहे.
S.Kakade/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1977511)