विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) - राष्ट्रीय विज्ञान दूरसंवाद आणि धोरण संशोधन संस्था ( एनआयएससीपीआर) ने साजरा केला 8 वा आयुर्वेद दिन 

Posted On: 10 NOV 2023 1:41PM by PIB Mumbai

 

9 नोव्हेंबर 2023 रोजी 8 वा आयुर्वेद दिन साजरा करण्यासाठी स्वस्तिक (SVASTIK)  उपक्रमाचा एक भाग म्हणून, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)   - राष्ट्रीय विज्ञान दूरसंवाद आणि धोरण संशोधन संस्था (एनआयएससीपीआर) ने केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेच्या (सीसीआरएएस) सहकार्याने जीवनशैली विकारांमध्ये आयुर्वेदाची भूमिकाया विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते.  सीएसआयआर - एनआयएससीपीआरचे मुख्य शास्त्रज्ञ आर.एस.जयासोमू यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि   प्रास्ताविक केले.विशेषतः सध्याच्या प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर , आयुर्वेदाचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करण्याचे महत्त्व जयासोमू  यांनी अधोरेखित केले. सीएसआयआर - एनआयएससीपीआरचे  शास्त्रज्ञ डॉ परमानंद बर्मन यांनी नवी दिल्लीतील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या संशोधन अधिकारी डॉ साक्षी शर्मा

वक्त्यांचा  परिचय करून दिला . आपल्या मुख्य भाषणात, डॉ शर्मा यांनी आजारातून बरे होण्याच्या प्रक्रियेपेक्षा उत्तम  आरोग्य राखण्याला  प्राधान्य देण्याच्या गरजेवर भर दिला. याशिवाय, त्यांनी  पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करत एखाद्याच्या जीवनशैलीची तपासणी  न करता औषधोपचार घेण्याच्या प्रचलित प्रथेबद्दल भीती व्यक्त केली. त्यांच्या  मार्गदर्शनपर  व्याख्यानात  प्रकृती, आयुर्वेद वेळापत्रक , आहार पद्धती आणि तणाव-संबंधित आरोग्य समस्या कमी करण्यासाठी धोरणे  यांसारख्या आयुर्वेदाच्या विविध पैलूंचा समावेश होता.  व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचे सत्र झाले. सीएसआयआर - एनआयएससीपीआर मधील मुख्य शास्त्रज्ञ आणि स्वस्तिकच्या पीआय /समन्वयक-  डॉ. चारू लता यांनी आभार प्रदर्शन केले  आणि वक्ते आणि श्रोत्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचा समारोप सीएसआयआर - एनआयएससीपीआरच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुमन रे यांच्या समन्वयाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराने झाला.

 

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976137) Visitor Counter : 112


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil