नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 2 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान तिसरी विशेष मोहीम 3.0 यशस्वीपणे पूर्ण केली
Posted On:
10 NOV 2023 10:29AM by PIB Mumbai
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यात(SCDPM,3.0) विविध उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. या मोहिमेमध्ये नागरी उड्डाण मंत्रालय आणि त्याच्या देशभर पसरलेल्या संलग्न, अधीनस्थ आणि स्वायत्त संस्थांनी,मोठ्या उत्साहाने भाग घेत, प्रमुख क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. मंत्रालयातील सर्वोच्च स्तरावर या मोहीमेच्या उपक्रमांचा तसेच प्रगतीचा नियमितपणे आढावा घेतला गेला; त्याचे निरीक्षण केले गेले आणि मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले गेले.
या मोहिमेदरम्यान ज्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यात आला.त्यापैकी काही सर्वोत्तम पद्धतींची माहिती पुढीलप्रमाणे :
सुगम (हरित शाश्वत विमानतळ मोहीम, SUGAM) तंत्रज्ञानातील पुढाकार:
ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली तयार करणे
प्री कंडिशन्ड एअर युनिट्स
ऑक्युपन्सी सेन्सर आणि डिमर
ऊर्जा कार्यक्षम HVAC प्रणाली
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या कक्षेत येणारे सर्व विमानतळ डिसेंबर 2024 पर्यंत अक्षय ऊर्जेवर काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकूण 54 विमानतळांनी त्यांच्या कामकाजात 100% अक्षय उर्जेचा उपयोग करत आणला आहे.
योग कक्ष विकसित करण्यासाठी मोकळ्या जागेचा वापर: भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विविध प्रादेशिक मुख्यालयांत आणि विमानतळांवर स्वच्छता मोहिमेनंतर मोकळ्या जागेवर योग कक्ष विकसित करण्यात आले आहेत.
Yoga Room in RHQ-SR, Chennai
Yoga Room created at Kolkata Airport
***
NM/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976111)
Visitor Counter : 120