अर्थ मंत्रालय
सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क भिवंडी आयुक्तालयाच्या ‘दक्षता जागरूकता आणि मुक्त संवाद बैठकीला व्यापार प्रतिनिधींची उपस्थिती
Posted On:
09 NOV 2023 12:44PM by PIB Mumbai
सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क भिवंडी आयुक्तालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर, 2023 रंग जी भिवंडी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील करदात्यांची "दक्षता जागरूकता आणि मुक्त संवाद बैठक" आयोजित करण्यात आली होती. करदात्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि व्यापार सुलभतेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करणे हा यामागचा उद्देश होता. आयुक्त मोहम्मद शमशाद आलम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सहआयुक्त दुर्गेश साळुंखे यांच्यासह सहाय्यक आयुक्त मानस दास, राजेश पमनानी, राजीव काकेरी, व्ही. रमेश बाबू, सुनील प्रसाद आणि अधीक्षक . बशीर वारशी, रुपेश मोहरे, दिनेश सिंह , विवेक त्यागी, आणि निरीक्षक जय कुमार आणि हेमंत कुमार शर्मा यांच्यासह विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. भिवंडी आयुक्तालयाच्या व्यापार हद्दीतील करदाते आणि त्यांचे प्रतिनिधी तसेच कर सल्लागारही उपस्थित होते.
या बैठकीत दक्षता जनजागृतीबाबत व्यापारी प्रतिनिधींना आयुक्तांनी मार्गदर्शन केले आणि त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचना किंवा तक्रारींचे स्वागत केले. तसेच जीएसटीच्या विविध पैलूंबाबत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. वरिष्ठ जीएसटी अधिकार्यांकडून निराकरण केलेल्या तक्रारी आणि सूचना देखील व्यापारी प्रतिनिधींनी यावेळी सामायिक केल्या. आगामी काळात विभाग स्तरावर आणि मुख्यालय स्तरावर कोणत्याही तक्रारी आणि सूचना सामायिक करण्यासाठी प्रतिनिधींना प्रोत्साहित करण्यात आले. वरिष्ठ अधिकार्यांचे ईमेल आयडी आणि संपर्क तपशील देखील व्यापार प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आले. आणि ही माहिती सीसीओ, सीजीएसटी मुंबई क्षेत्राच्या संकेतस्थळावरून देखील मिळवता येईल, असे उपस्थित प्रतिनिधींना सांगण्यात आले. करदात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विभागाच्या प्रयत्नांचे व्यापारी प्रतिनिधींनी कौतुक केले आणि अशा प्रकारचे जनसंपर्क कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले.

***
N.Meshram/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1975859)
Visitor Counter : 129