युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

खेलो इंडियाच्या खेळाडूंनी केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिंकली अनेक पदके

Posted On: 07 NOV 2023 2:58PM by PIB Mumbai

 

गोव्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स (KISCE) च्या खेळाडूंनी 2 ते 6 नोव्हेंबर दरम्यान डेहराडून येथे नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा  2023 मध्ये जलतरण आणि टेबल टेनिस प्रकारात अनेक पदके जिंकली आहेत.

जलतरणात, धीमन कश्यपने 50 मीटर बॅकस्ट्रोक आणि 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावले. आणखी एक जलतरणपटू टिसा हिने गोव्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स येथे दिल्या जाणाऱ्या असामान्य प्रशिक्षणाच्या जोरावर 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

टेबल टेनिसमध्ये, खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्सच्या नियती पाठकने 14 वर्षांखालील सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले तर रिया गोपीने 17 वर्षांखालील एकेरी गटात  कांस्यपदक जिंकले. गोव्यासाठी पदकांची लयलूट सुरू ठेवत हिया पटेलने 19 वर्षांखालील सांघिक स्पर्धेत चौथे स्थान मिळवले.

गोव्यातील खेलो इंडिया क्रीडापटूंच्या यशातून मूलभूत स्तरावर क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि राज्यातील विविध क्षेत्रातील प्रतिभा शोधण्याप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित होते. गोव्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स येथे अनुभवी प्रशिक्षक जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देत असल्याचा हा एक भक्कम दाखला आहे.

सुजित टी ए (जलतरण ) आणि ओपेन्द्रो सिंग (टेबल टेनिस) यांच्यासह इतर प्रशिक्षकांच्या समर्पणाशिवाय ही कामगिरी शक्य झाली नसती. या प्रशिक्षकांनी गोव्यातील नवोदित खेळाडूंच्या कौशल्याचा गौरव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2 ते 6 नोव्हेंबर दरम्यान डेहराडून येथे नुकत्याच संपन्न झालेल्या केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा  2023 मध्ये गोव्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स (KISCE) च्या खेळाडूंनी जलतरण आणि टेबल टेनिस स्पर्धेत अनेक पदके कमावली आहेत.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1975407) Visitor Counter : 57


Read this release in: English