निती आयोग
azadi ka amrit mahotsav

शाश्वत विकास  उद्दिष्टे आणि ट्रॅव्हल फॉर लाइफ यांच्यावर अधिक भर देऊन पर्यटन क्षेत्रासाठी गोवा आराखडा राबवण्यावर उद्योजक आणि तज्ञांची चर्चा


“पर्यटनासाठी गोवा आराखड्याची अंमलबजावणी” या विषयावर नीती आयोगाची कार्यशाळा

Posted On: 04 NOV 2023 7:34PM by PIB Mumbai

 

सध्या सुरु असलेल्या जी-20 विचारवंत गटाच्या कार्यशाळा मालिकेचा भाग म्हणून, नीती आयोगाने, इंडिया फाऊंडेशन तसेच केंद्रीय पर्यटन मंत्रालय या माहिती भागीदार संस्थांसह   पर्यटनासाठी गोवा आराखड्याची अंमलबजावणीया विषयावर आज 04 नोव्हेंबर 2023 रोजी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते.

गोवा येथे 21 जून 2023 रोजी पर्यटन विषयावर जी-20 समूहाची बैठक झाली आणि त्यात गोवा जाहीरनामा देखील घोषित करण्यात आला. एसडीजीज अर्थात शाश्वत विकास ध्येये गाठण्यासाठीचे साधन  म्हणून पर्यटनाचा पर्याय सुचवणारा गोवा जाहीरनामा म्हणजे एसडीजीज साध्य करण्यासाठीची प्रेरक शक्ती म्हणून पर्यटन क्षेत्राचा उपयोग करून घेण्याच्या दिशेने केलेले अग्रेसर प्रयत्न आहेत. जी-20 नवी दिल्ली नेत्यांच्या जाहीरनाम्यात (एनडीएलडी)पर्यटनासाठीचा गोवा आराखडा आणि ट्रॅव्हल फॉर लाईफकार्यक्रम यांचा शाश्वत सामाजिक-आर्थिक विकास साध्य करण्याचा मार्ग म्हणून पर्यटनाची जोपासना करण्यासाठीच्या धोरणात्मक आराखडा  म्हणून उल्लेख करण्यात आला.

गोवा आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आणि चार संकल्पनात्मक सत्रांमध्ये ही चर्चा करण्यात आली. या संपूर्ण सत्रात, केंद्रीय पर्यटन मंत्रालय सचिव व्ही.विद्यार्थी यांनी संकल्पनात्मक भाषण केले.या कार्यशाळेचे मुख्य अतिथी म्हणून नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी अध्यक्षपदावरून बोलताना काही सूचना केल्या आणि दिवसभरातील चर्चांची पार्श्वभूमी तयार केली. लिंगाधारित विकास आणि नारी शक्तीचे सशक्तीकरण यांच्या अनुषंगाने काम करत पर्यटन क्षेत्राचा विकास साधण्याच्या गरजेवर त्यांनी अधिक भर दिला. पर्यटनाचा प्रसार आणि त्याचे व्यवस्थापन ही सध्याच्या काळातील आव्हाने आहेत यावर देखील त्यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले की खासगी आणि सरकारी क्षेत्रांच्या दरम्यान सह-निर्मितीची कृती यासाठी व्यवहार्य उपाय सुचवू शकेल असे ते म्हणाले.

या कार्यशाळेतील चर्चा अधिक समृध्द करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने तसेच हवामान बदल मंत्रालयासारख्या 20 सरकारी आणि खासगी संस्थांतील प्रमुख व्यक्ती तसेच इतर वक्त्यांनी  त्यांचे मौलिक विचार मांडले.

पर्यटन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्याच्या मार्गात असलेल्या विविध समस्या, संधी आणि आव्हाने यांच्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. स्थानिक पर्यटन हा उत्पन्न तसेच सांस्कृतिक उन्नती या दोन्हींचा प्रमुख स्त्रोत आहे असे निरीक्षण यावेळी नोंदवण्यात आले. 

गोवा आराखड्यातून उदयाला आलेले महत्त्वाचे मुद्दे आणि कार्यबिंदू यांची निश्चिती या कार्यशाळेत करण्यात आली.  या कार्यक्रमातून डिजिटल क्रांती किंवा अधिक चांगल्या प्रकारे पर्यावरणीय कर्तव्ये करण्याची गरज यांसारखी नवी आव्हाने तसेच संधींवर अधिक प्रकाश टाकण्यात आला तसेच या आव्हानांवर उपाय शोधण्याची निकड देखील समजून घेण्यात आली. आपला ग्रह आणि त्यावरील लोक यांना शाश्वत आधार  देणाऱ्या पर्यटन क्षेत्रासाठी सामुहिक कृती आणि सामायिक जबाबदारी यांची एकत्रित चेतना म्हणजेच गोवा आराखड्याची उर्जा पुढे प्रवाहित करण्याच्या वचनबद्धतेसह या  कार्यशाळेचा समारोप झाला.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1974772) Visitor Counter : 100


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu