राष्ट्रपती कार्यालय

"सायलेंट कॉन्व्हर्सेशन: फ्रॉम मार्जिन्स टू द सेंटर" या कला प्रदर्शनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 03 NOV 2023 7:06PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 नोव्हेंबर, 2023) नवी दिल्ली येथे सायलेंट कॉन्व्हर्सेशन: मार्जिन टू द सेंटर”  नामक कला प्रदर्शनाचे उद्घाटन केले. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने  सांकला   फाउंडेशनच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

आज जगातील 70 टक्के वाघ भारतात आढळतात आणि व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांच्या आसपास राहणाऱ्या समुदायांचे या यशात महत्त्वाचे योगदान आहे असे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले. हे प्रदर्शन व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास राहणारे लोक आणि वन व  वन्यजीव यांच्यातील संबंध कलाकृतींच्या माध्यमातून दाखवत असल्याचे पाहून त्यांनी संतोष व्यक्त केला.

हवामान बदलाची गंभीर समस्या लक्षात घेता सर्वांगीण आणि सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाल्या की  केवळ पर्यावरण रक्षणासाठीच नव्हे, तर मानवतेच्या अस्तित्वासाठी आदिवासी समाजातील जीवनमूल्ये अंगीकारली पाहिजेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहून समृद्ध आणि आनंदी जीवन कसे शक्य आहे हे त्यांच्याकडून शिकायला हवे.

राष्ट्रपतींनी उद्धृत केले कि, अनियंत्रित भौतिकवाद, क्रूर व्यापारवाद आणि लोभी संधीसाधूपणाने आपण असे जग तयार केले आहे, जिथे जीवनाचे पाचही घटक संकटग्रस्त आणि व्यथित आहेत. हवामान बदलामुळे अन्न आणि जल सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. पारंपरिक आणि आधुनिक विचारांची सांगड घालण्याची गरज आहे हे ओळखून आपले संवर्धन, अनुकूलन आणि निराकरण करण्याच्या धोरणांना अधिक बळकट करण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला. आपण स्वदेशी ज्ञानाचे जतन, संवर्धन आणि उपयोग करणे आवश्यक आहे. त्याचवेळी, वन दलाचे वनसंरक्षक आणि सक्षम पुत्र-कन्या हे त्यांचे हक्क, योग्य स्थान आणि समाजात मान्यता मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

***

S.Kakade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974598) Visitor Counter : 123