उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विशेष गरजा असलेल्या (स्वमग्न) मुलांना सन्मानाचं जीवन लाभावं यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता -उपराष्ट्रपती

Posted On: 29 OCT 2023 4:15PM by PIB Mumbai

 

ऑटिझमग्रस्त अर्थात विशेष गरजा असलेल्या (स्वमग्न) मुलांना सन्मानाचे जीवन लाभावे यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे आवाहन, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. "यामुळे त्यांच्यात स्वाभिमान आणि समाजाकडून स्वीकारले गेल्याची भावना निर्माण होईल", असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या मुलांसाठी जग सुरक्षित आणि जीवन अर्थपूर्ण बनवणाऱ्या भविष्याचा मार्गप्रत्येकाने तयार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नवी दिल्लीतील हिगाशी ऑटिझम शाळेच्या उद्घाटन समारंभात एका मेळाव्याला संबोधित करताना ते आज बोलत होते. उपराष्ट्रपतींनी नमूद केले की ही सर्व जबाबदारी, आई आपल्या खांद्यावर घेते आणि अशा मुलांची वाढ होण्यात कुठलीही कसर बाकी राहू नये म्हणून प्रत्येक सुखाचा त्याग करते. म्हणूनच, जेव्हा अशा मुलाला आत्ममग्नतेच्या (ऑटिझम) आव्हानाचा सामना करावा लागतो आणि त्याला आधाराची गरज  असते, तेव्हा घरातील  पुरुषांनीही, त्यांच्या जोडीदार आणि साथीदारांच्या खांद्याला खांदा लावून ही जबाबदारी निभावण्याचा वसा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या आव्हानांना तोंड देताना आपल्या जोडीदाराला एकटे न सोडण्याचे महत्त्व अधोरेखित करत उपराष्ट्रपतींनी सांगितले की या आव्हानात्मक काळात जोडीदाराला एकटे सोडून दिल्यास, तुम्ही स्वतःला माणूस म्हणवून घेण्याचा अधिकार गमावून बसाल. 

जेव्हा लहान मूल ऑटिझमच्या आव्हानाला तोंड देत असते तेव्हा 'वन-साईज-फिट-ऑल' म्हणजेच सर्वांना एकच न्याय, सब घोडे बारा टक्के असा दृष्टीकोन त्यांच्याबाबत बाळगून चालत नाही, असेही त्यांनी नमूद केले.   "प्रत्येक मुलाच्या विशिष्ट गरजा असतात, प्रत्येक मूल वेगळे असते" असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या  व्यक्तिमत्त्वात काय त्रुटी आहेत याची पर्वा न करता, या विशाल जगात कसे वावरायचे याचा अनुभव आपल्या मुलांना घेऊ द्या, अशी गरजही धनखड यांनी ठळकपणे व्यक्त केली. 

***

S.Kane/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1972827) Visitor Counter : 120


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil