आयुष मंत्रालय

सर्वांगीण आरोग्य देखभाल दृष्टिकोनासह भारताने जागतिक नेतृत्वासाठी पुढाकार घ्यावा : सर्वानंद सोनोवाल


अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या विस्तारासाठी गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाकडून 12 एकर जमीन प्रदान

Posted On: 20 OCT 2023 5:23PM by PIB Mumbai

 

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने आज आपला सहावा संस्थापना दिवस साजरा केला. दिवंगत पद्मविभूषण वैद्य बृहस्पती देव त्रिगुणा यांच्या पुतळ्याचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते "वैद्य बृहस्पती देव त्रिगुणा सभागृह" येथे अनावरण, हा या कार्यक्रमातील संस्मरणीय क्षण ठरला.

वैद्य बृहस्पती देव त्रिगुण हे आयुर्वेद जगतातील एक महान व्यक्तिमत्व होते. वैद्यकी आणि आयुर्वेदाचा प्रचार यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते.  त्यांच्या जीवनकार्यासाठी त्यांना देशातील  सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

केंद्रीय आयुष्य मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आजच्या कार्यक्रमाला संबोधित केले. भारताने सर्वांगीण आरोग्य देखभाल  दृष्टिकोनासह जागतिक नेतृत्व घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे सोनोवाल यांनी यावेळी सांगितले.  जगभरातील गुंतवणूकदार आयुष क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून  या  संधीचा लाभ  घेण्यासाठी आपण कार्य  केले पाहिजे, असे ते म्हणाले.

गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या विस्तारासाठी 12 एकर जमीन दिली असल्याची माहिती सोनोवाल यांनी यावेळी दिली.  सर्वांगीण आरोग्य देखभालीसाठी सेवा अद्ययावत करण्यासाठीच्या संस्थेच्या प्रयत्नांना या साहाय्यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

या कार्यक्रमात, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था  आणि हिंदुस्तान सॉल्ट, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आणि हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांसारख्या विविध प्रसिद्ध संस्थांमध्ये सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. संस्थेला प्रगत  संशोधनासाठी नवीन रेणवीय  जीवशास्त्र प्रयोगशाळा, हस्तलिखित एकक  आणि दक्ष कौशल्य केंद्र यांचा लाभ झाला आहे. यामुळे संस्थेकडून केल्या जाणाऱ्या  संशोधनात प्रगती होऊन  यशाचा नवा मार्ग तयार होईल

आयुष राज्यमंत्री  महेंद्रभाई मुंजपारा यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले.  गेल्या सहा वर्षांत, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था उत्कृष्टतेचे, नावीन्यपूर्णतेचे प्रतीक आणि आपल्या जुन्या परंपरा व  आधुनिक आरोग्यसेवेच्या गरजांमधील सेतू  म्हणून विकसित झाली आहे, असे ते म्हणाले.  संस्थेने आयुर्वेदिक संशोधन, अध्यापन आणि वैद्यकीच्या क्षमता सातत्याने उंचावल्या आहेत.   याच अनुषंगाने संस्थेने रेणवीय जीवविज्ञान प्रयोगशाळा आणि कौशल्य प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत.

अगदी अलीकडेच, नॅकद्वारे संस्थेला A++ श्रेणी मानांकन मिळाले आहे.  पहिल्याच फेरीत असे यश साध्य करणारी  आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही पहिली संस्था आहे.  नॅकचे A++ प्रमाणपत्र संस्थेच्या संचालक प्रा.(डॉ.) तनुजा नेसारी यांना यावेळी सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. संस्थेने हिंदुस्तान सॉल्ट्स लिमिटेड, राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था  आणि इतर  विविध प्रतिष्ठित संस्थांसोबत सहा सामंजस्य करार केले. या कार्यक्रमात  कोविड डायरीसह  विविध तांत्रिक दस्तऐवज प्रकाशित  करण्यात आले.

***

G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1969532) Visitor Counter : 53


Read this release in: English , Urdu , Hindi , Assamese