संरक्षण मंत्रालय

भारत-फ्रान्स सैन्य उपसमितीची 21वी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न

Posted On: 18 OCT 2023 2:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑक्‍टोबर 2023

 

भारत-फ्रान्स सैन्य उपसमितीची 21 वी बैठक  16-17 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीतील हवाई दल तळ येथे आयोजित करण्यात आली होती. आयडीएस मुख्यालय येथे भारताकडून एकीकृत स्टाफचे सहाय्यक प्रमुख एअर व्हाइस मार्शल आशिष वोहरा मुख्यालय आणि फ्रान्सकडून संयुक्त स्टाफचे आंतरराष्ट्रीय लष्करी संबंध विभागाचे जनरल ऑफिसर मेजर जनरल एरिक पेल्टियर यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.

भारत-फ्रान्स सैन्य उपसमिती हा एकात्मिक संरक्षण कर्मचारी  मुख्यालय आणि फ्रान्सच्या सशस्त्र दलांचे संयुक्त कर्मचारी मुख्यालय यांच्यात धोरणात्मक आणि परिचालन स्तरावर नियमित चर्चेद्वारे दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्य विकसित करण्यासाठी  स्थापन केलेला एक मंच आहे.

ही बैठक मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यमान द्विपक्षीय संरक्षण सहकार्य यंत्रणेच्या कक्षेत नवीन उपक्रमांवर तसेच आधीपासून सुरु असलेले संरक्षण विषयक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1968710) Visitor Counter : 74


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil