विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जमिनीवर असलेल्या एयरग्लो इमेजरचा वापर करून शोधलेल्या ढगांच्या विविध प्रकारच्या रचना आणि गुणधर्म नैऋत्य मोसमी पावसाच्या स्वरुपात खूप मोठा बदल झाल्याकडे निर्देश करत आहेत

Posted On: 17 OCT 2023 3:38PM by PIB Mumbai

 

2016 ते 2020 या दरम्यान महाराष्ट्रात कोल्हापूरच्या आकाशातील ढगांचा वेग आणि वाऱ्याचे स्वरुप यांचा मार्च ते मे दरम्यान केलेल्या पाहणीत नैऋत्य मोसमीपूर्व ढगांचे स्वरुप आणि त्यांची आगेकूच यामध्ये बदल झालेला आढळला असून त्यातून नैऋत्य मोसमी पावसाच्या स्वरुपात खूप मोठा बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत. पृथ्वीच्या वातावरणावर ढगांचा परिणाम लक्षणीय असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रक्रियांद्वारे त्याचे स्वरुप बिगररेखीय असते. उपग्रहांचे संवेदक ढगांच्या हालचालींचा माग काढतात आणि ढग वाऱ्यासोबत वाहत असतात या धारणेखाली, ढगांच्या हालचालींचा सीएमव्ही अर्थात क्लाऊड मोशन व्हेक्टर निश्चित करतात. वातावरणाची गतिशीलता आणि त्यामध्ये फिरणारे विविध घटक यांच्या मापनासाठी सीएमव्ही अतिशय उपयुक्त असतात.

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जिओमॅग्नेटिझमच्या शास्त्रज्ञांनी ऑल स्काय इमेजर डेटा(एएसआय)चा वापर कमी उंचीवर कोल्हापूर केंद्रावरील(16.8° N, 74.2° E) ढगांचा माग काढण्यासाठी केला जो डेटा सामान्यपणे वातावरणाच्या वरच्या थराच्या अभ्यासासाठी वापरला जातो. त्याच प्रकारे स्काय इमेजरचा वापर हा सामान्यतः रात्रीच्या वेळी आकाशातील हवेच्या चमकदारपणाचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो, मात्र शास्त्रज्ञांनी त्याचा वापर ढगांचा माग काढण्यासाठी केला. त्यांनी रात्रीच्या वेळी आकाशात जमा झालेल्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी या माहितीचा वापर केला. हवेच्या चमकदारपणाच्या अभ्यासाकरिता(एयरग्लो स्टडी) वाया माहिती किंवा ढगाळ आकाशाची माहिती ही विसंगत समजली जाते, जी या अभ्यासात उपयुक्त ठरली हेच या अभ्यासाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

एएसआय या इमेजरचे अवकाशीय रिझॉल्युशन अतिशय उच्च असते आणि यामुळे शास्त्रज्ञांना 10 किमी रिझॉल्युशनच्या इन्सॅट डेटाबरोबर या डेटाची तुलना करण्यात मदत झाली. 2016 ते 2020 या काळात मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये संकलित केलेल्या एयरग्लो मॉनिटरिंगच्या(हवेच्या चमकदारपणाचे निरीक्षण) डेटाचा वापर करून संशोधकांनी ढगांच्या सरकण्याशी संबंधित व्हेक्टर(सीएमव्ही), ढगांच्या व्याप्तीची टक्केवारी आणि ढगांच्या सरकण्याची दिशा यांची गणना केली. 2017 मध्ये 10±3 m s–1 ही सर्वात मंद गती आढळली जी इतर वर्षांमध्ये 15±3 m s–1 पेक्षा जास्त होती. या काळात ढग धारणे अंतर्गत नैऋत्य दिशेला सरकत असल्याचे आढळले.   

कोल्हापूर हे स्थान अरबी समुद्राच्या जवळ असल्याने, वारा, त्याचप्रमाणे ढगांचे सरकणे नैऋत्य दिशेला असल्याचे आमच्या डेटामध्ये नोंद केल्यानुसार पाहायला मिळाले. जसजशी वर्षे पुढे जात आहेत तसतसे ढगांचे सरकणे नैऋत्य दिशेकडे सरकत आहे ही बाब विचारात घेणे महत्त्वाचे आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील आकडेवारीमध्ये हे जास्त ठळकपणे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात होणारे हवामानबदल आणि याचा काही संबंध असू शकेल. या विश्लेषणाचा वापर करून संशोधकांनी हे दाखवून दिले की नैऋत्य मोसमी पावसाच्या(मान्सूनच्या) स्वरुपात बदल होत आहे आणि त्यामुळे पाऊस पडण्याच्या स्वरुपावर देखील त्याचा परिणाम पाहायला मिळू शकेल.

Description: C:\Users\Dell\Downloads\Figure 4 600 dpi.jpg

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968543) Visitor Counter : 72


Read this release in: English , Urdu , Hindi