सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

केव्हीआयसी तर्फे पणजी येथे खादी प्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 17 OCT 2023 4:52PM by PIB Mumbai

 

मुंबई 17 ऑक्टोबर 2023 

केव्हीआयसी अर्थात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या पणजी येथील कार्यालयाने मडगाव येथील के.जी.भवनाच्या सहकार्याने काल 16 ऑक्टोबर 2023 रोजी, पणजीतील गोवा पर्यटन महामंडळाच्या कार्यालयात खादी आणि ग्रामोद्योगच्या (केव्हीआय) उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश चंद्रु गावकर यांनी या प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन करून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले झाल्याची घोषणा केली. दोन्ही आयोजक विभागांतील तसेच पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

उद्घाटनपर भाषणात बोलताना अध्यक्ष डॉ.गावकर यांनी या प्रदर्शनातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या उत्पादनांपैकी किमान एक तरी उत्पादन खरेदी करून या उपक्रमाला मदत करण्याचे आवाहन पर्यटन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना केले. आजच्या कार्यक्रमाने खादी आणि केव्हीआयसी उत्पादनांच्या वापराच्या अनेक लाभांविषयी ग्राहकांना माहिती देण्याच्या दृष्टीने केव्हीआयसीच्या अधिकाऱ्यांना एक उत्तम मंच उपलब्ध करून दिला.

प्रदर्शनाला भेट देणारे सर्वजण तेथे ठेवण्यात आलेल्या खादीच्या वस्तूंच्या वैविध्यपूर्ण श्रेणी पाहून प्रभावित झाले. आणि ही उत्सुकता केवळ ग्राहकांपर्यंत मर्यादित नव्हती.आजूबाजूच्या विभागांतील अधिकाऱ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने या प्रदर्शनातील स्टॉल्सना भेट दिली आणि तेथे छायाचित्रे काढून, वस्तू देखील खरेदी केल्या.गोवा पर्यटन विभागाने दिलेल्या उदंड प्रतिसादातून, पर्यावरण स्नेही, अत्युत्कृष्ट दर्जा आणि मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक महत्त्व असलेल्या खादी आणि ग्रामोद्योगांच्या उत्पादनांना मिळणारा वाढता प्रतिसाद दिसून आला.

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1968454) Visitor Counter : 67


Read this release in: English