ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक मानक दिन 2023 ला भारतीय मानक ब्युरोतर्फे ‘मानक महोत्सव’ ह्या मानकविषयक परिसंवादाचे उद्या आयोजन

Posted On: 13 OCT 2023 7:51PM by PIB Mumbai

मुंबई, 13 ऑक्‍टोबर 2023

 

जागतिक मानक दिन 2023 च्या निमित्ताने उद्या भारतीय मानक ब्युरोने(BIS) मानक महोत्सव या मानकविषयक परिसंवादाचे आयोजन केले आहे. जागतिक मानके तयार करण्यासाठी मानके म्हणून प्रकाशित करण्यात आलेले ऐच्छिक तांत्रिक करार विकसित करणाऱ्या हजारो तज्ञांच्या सहकार्यकारक प्रयत्नांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी जागतिक मानक दिन साजरा केला जातो. “शाश्वत विकासाच्या लक्ष्यांसाठी मानके- अधिक चांगल्या जगासाठी सामाईक दृष्टीकोन-एसडीजी-3- उत्तम आरोग्य आणि निरामयता” ही उद्या साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाची संकल्पना आहे.    

मानक महोत्सवाचा भाग म्हणून पालघर जिल्ह्यातील ग्राम पंचायत अध्यक्षांसाठी( सरपंचांसाठी) आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये दर्जा आणि मानकांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दर्जा संलग्नता कार्यक्रमासह युवा ते युवा अभियान राबवण्यात येणार आहे.

त्याशिवाय बीआयएसकडून घरोघरी जागरुकता अभियानाचे आयोजन, पथनाट्ये, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वादविवाद/ तांत्रिक सत्रे आयोजित केली जाणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती बीआयएसच्या पश्चिमी प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक संजय गोस्वामी यांनी दिली.

युवा वर्गासोबत होणाऱ्या संवादादरम्यान, स्वयंसेवकांकडून बीआयएसविषयी, बीआयएस अनिवार्य प्रमाणीकरणांतर्गत नेहमीच्या वापरातील घरगुती वस्तू यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बीआयएस वेबसाईटचे सादरीकरण करण्यात येईल आणि बीआयएस केअर ऍप आणि तक्रार निवारण प्रणालीसह नो युवर स्टँडर्ड्स विषयी देखील मार्गदर्शन केले जाईल.

बीआयएस ही केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत असलेली भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. मानके प्रस्थापित करणे, प्रमाणीकरण, प्रयोगशाळेतील चाचण्या,  हॉलमार्किंग आणि प्रणाली प्रमाणीकरण ही आमची मुख्य कामे आहेत. सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार वस्तूंच्या उपलब्धतेची सुनिश्चिती, आरोग्यविषयक धोक्यांमध्ये कपात  आणि पर्यावरणाचे रक्षण करून बीआयएस देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत आहे.

मुंबईमध्ये आयोजित होत असलेल्या कार्यक्रमाचे तपशील https://pib.gov.in/MediaInvitationDetail.aspx?InvitationID=156896 या ठिकाणी पाहता येतील.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, रायगडचे कुलगुरु प्रो. डॉ. कारभारी विश्वनाथ काळे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्याशिवाय मान्यवर वक्ते आणि उद्योग आणि सरकारी संस्थांमधील तज्ञ कार्यक्रमाच्या संकल्पनेवर आणि  त्यांच्या संस्थांकडून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांबाबत चर्चा करतील. या कार्यक्रमात या क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हितधारकांना सन्मानित देखील करण्यात येईल.

 

* * *

PIB Mumbai | R.Aghor/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1967526) Visitor Counter : 80


Read this release in: English