नागरी उड्डाण मंत्रालय
केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयात विशेष मोहीम 3.0 ला सुरुवात
विशेष मोहीम 3.0 सुरु झाल्यापासून पहिल्याच आठवड्यात 4360 फाईलींचे पुनरिक्षण करण्यात आले, 7310 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आणि 316 सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यात आले
विशेष मोहीम 3.0 च्या पहिल्याच आठवड्यात (2 ते 7 ऑक्टोबर,2023) टाकाऊ सामानाच्या विल्हेवाटीतून 45,01,904 रुपयांचा महसूल मिळवण्यात आला
मंत्रालय, त्यांची संलग्न कार्यालये, स्वायत्त संस्था आणि सीपीएसईज यांच्यातर्फे स्वच्छतेसाठी 582 ठिकाणे निश्चित करण्यात आली
फायलींची छाननी तसेच टाकाऊ सामान आणि इतर अनावश्यक साहित्याची विल्हेवाट लावल्यानंतर 50,000 चौरस फूटपेक्षा जास्त जागा मोकळी करून घेण्याचे उद्दिष्ट
Posted On:
12 OCT 2023 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2023
प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि स्वच्छतेचे संस्थात्मकीकरण या उद्देशासह केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय विशेष मोहीम 3.0 (2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर) मध्ये सहभागी झाले आहे.


या मोहिमेच्या पूर्वतयारीच्या टप्प्यात (15 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर, 2023) विविध श्रेणींमधील प्रलंबितता निश्चित करण्यात आली, पुनरिक्षण कार्यासाठी 7,923 वास्तविक फाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक प्रकारच्या 3,538 फाईल्स निश्चित करून ठेवण्यात आल्या. त्यासोबतच, या मोहिमेदरम्यान 966 सार्वजनिक तक्रारी आणि 230 तक्रार अपिलांवर देखील कार्यवाही करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी “एक तारीख, एक तास,एकमेकांसोबत” श्रमदानात सहभागी होण्यासाठी केलेल्या सार्वत्रिक आवाहनानुसार व्यापक स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देखील या अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यात योगदान देण्याच्या उद्देशाने सर्व सहकारी संस्थांच्या समवेत मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व प्रादेशिक/क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियानावर भर देणारी कृती योजना विकसित केली.1 ऑक्टोबर 2023 रोजी स्वच्छता मोहीम आणि श्रमदान विषयक 140 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मोहिमेच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यातच ( 2 ते 7 ऑक्टोबर 2023) 4360 फायलींचे पुनरिक्षण करण्यात आले, 7310 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली, नागरिकांच्या 316 तक्रारींचे निवारण करण्यात आले आणि टाकाऊ सामानाच्या विल्हेवाटीतून मंत्रालयाला 54,01,904 रुपयांचा महसूल मिळाला.

या मोहिमेच्या उद्दिष्टांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच इतरांना त्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी मंत्रालय तसेच मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत संस्था यांच्या अधिकृत समाज माध्यम सुविधेतर्फे एक्स (पूर्वीचे ट्विटर) मंचावर 180 पेक्षा अधिक ट्विट संदेश पाठवण्यात आले होते.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1967171)
Visitor Counter : 151