दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा टपाल विभागातर्फे राष्ट्रीय टपाल सप्ताह 2023 निमित्त फिलाटेली दिन साजरा
Posted On:
11 OCT 2023 5:59PM by PIB Mumbai
पणजी, 11 ऑक्टोबर 2023
राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून गोवा टपाल विभागातर्फे आज टपाल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात टपाल कार्यालयाचे वरिष्ठ टपाल अधीक्षक संजय वाळवेकर यांच्या हस्ते विशेष तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. एम. आर. रमेश कुमार, वरिष्ठ पोस्टमास्तर पणजी मुख्यालय जी. एस. राणे, फिलाटेलिस्ट आणि इतर टपाल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

फिलाटेली कार्यक्रमात भारतातील वन्यजीवांना समर्पित दोन फ्रेम्स, एक फ्रेम भारतीय शास्त्रज्ञांना अधोरेखित करणारी आणि दुसरी फ्रेम भारतातील महिला स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित होती. या दोन्ही फ्रेम डॉ. एम. आर. रमेश कुमार यांनी तयार केल्या आहेत.

फिलाटेली प्रदर्शन 11 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत पणजी मुख्य टपाल कार्यालयातील पणजी फिलाटेली ब्युरो येथे सकाळी 10.00 ते दुपारी 4.30 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

याशिवाय टपाल विभागाने डॉ. एम. आर. रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली टपाल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेमिनार आणि फिलाटेलिक प्रश्नमंजुषेचे आयोजन केले होते.


गोवा टपाल विभागातर्फे खांडोळा, माशेल येथील शासकीय कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 'डिजिटल इंडिया फॉर न्यू इंडिया' या विषयावर 'पत्रलेखन स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1966758)
Visitor Counter : 110