रेल्वे मंत्रालय
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी भारतीय चमूतील रेल्वेच्या खेळाडूंचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अभिनंदन
या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या 107 पदकांमध्ये रेल्वेच्या खेळाडूंचे 22 पदकांचे योगदान
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2023 5:43PM by PIB Mumbai
नवी दिल्लीत रेलभवन येथे आज रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ क्रीडा अधिकारी आणि 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय दलाच्या डेप्युटी शेफ डी मिशन डोला बॅनर्जी आणि पूर्वकिनारा रेल्वेचे सहाय्यक क्रीडा अधिकारी आणि सुवर्णपदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघाचे सदस्य अमित रोहिदास यांची भेट घेतली.
चीनमधील हांगझू येथे झालेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा, 2022 मध्ये भारतीय चमूने केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल मंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी भारतीय चमूमध्ये भारतीय रेल्वे चे एकूण 98 सदस्य, ज्यात 90 खेळाडू, 07 प्रशिक्षक आणि डेप्युटी शेफ डी मिशन म्हणून डोला बॅनर्जी यांचा समावेश होता. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या 107 पदकांमध्ये भारतीय रेल्वेच्या खेळाडूंनी 22 पदकांचे योगदान दिले आहे.


18व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 ,मध्ये भारतीय रेल्वेच्या खेळाडूंनी 69 पदकांपैकी 09 पदकांसाठी योगदान दिले होते या तुलनेत 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जिंकलेल्या 107 पदकांपैकी रेल्वे खेळाडूंचे 22 पदकांचे योगदान आहे. त्यामुळे भारतीय पदकतालिकेत भारतीय रेल्वेच्या खेळाडूंचे योगदान 58% ने वाढले आहे.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1966434)
आगंतुक पटल : 291