श्रम आणि रोजगार मंत्रालय
औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (2016=100) – ऑगस्ट, 2023
Posted On:
30 SEP 2023 8:30PM by PIB Mumbai
श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे संलग्न कार्यालय असलेले श्रम ब्युरो देशातील 88 औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या केंद्रांवर विस्तारित 317 बाजारांमधून एकत्र केलेल्या किरकोळ किमतींच्या आधारे दर महिन्याला औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक संकलित करत आहे. हा निर्देशांक 88 केंद्रे आणि अखिल भारतीय स्तरावर संकलित केला जातो आणि त्यानंतरच्या महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी प्रकाशित केला जातो. ऑगस्ट 2023 महिन्याचा निर्देशांक या प्रसिद्धीपत्रकात जारी केला जात आहे.
ऑगस्ट, 2023 साठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक-औद्योगिक कामगार 0.5 अंकांनी कमी झाला आणि 139.2 वर राहिला. 1-महिन्याच्या टक्केवारीतील बदलानुसार, मागील महिन्याच्या तुलनेत तो 0.36 टक्क्यांनी घसरला आहे, जो एक वर्षापूर्वी याच महिन्यामध्ये 0.23 टक्क्यांनी वाढला होता. . सध्याच्या निर्देशांकातील जास्तीत जास्त घसरणीचा दबाव खाद्य आणि पेय गटातून आला असून एकूण बदलामध्ये त्याचे 0.71 टक्के योगदान आहे. वस्तूंमध्ये , गहू, कोंबडी/चिकन, अंडी-कोंबडी, कापूस बियाणे तेल, सफरचंद, वांगी, फ्लॉवर, हिरवी मिरची, आले, भेंडी , टोमॅटो, वीज , केरोसीन तेल इत्यादी निर्देशांकातील घसरणीला जबाबदार आहेत. मात्र या घसरणीवर तांदूळ, तूरडाळ, कांदा, जिरे, शिजवलेले जेवण, शिवणकाम शुल्क, पुस्तके शाळा/आयटीआय, खाजगी शिक्षक/कोचिंग सेंटर शुल्क , ट्यूशन आणि इतर शुल्क -महाविद्यालय आणि शाळा/आयटीआय, स्टेशनरीच्या किमतींनी नियंत्रण ठेवले.
केंद्र स्तरावर जयपूरमध्ये सर्वाधिक 4.8 अंकांची घट नोंदवली गेली. इतरांमध्ये, 3 केंद्रांमध्ये 3 ते 3.9 अंकांच्या दरम्यान, 11 केंद्रांमध्ये 2 ते 2.9 अंकांच्या दरम्यान, 13 केंद्रांमध्ये 1 ते 1.9 अंकांच्या दरम्यान आणि 22 केंद्रांमध्ये 0.1 ते 0.9 अंकांच्या दरम्यान घट नोंदवली गेली. याउलट, कटकमध्ये सर्वाधिक 4.4 अंकांची वाढ नोंदवली गेली, त्यानंतर जालंधरमध्ये 4.0 अंकांची आणि दादरा आणि नगर हवेली आणि कोल्लममध्ये प्रत्येकी 3.7 अंकांची वाढ झाली. उर्वरित केंद्रांपैकी, 3 केंद्रांमध्ये 2 ते 2.9 अंक , 9 केंद्रांमध्ये 1 ते 1.9 अंक आणि 18 केंद्रांमध्ये 0.1 ते 0.9 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. उर्वरित 4 केंद्रांचे निर्देशांक स्थिर राहिले.
मागील महिन्यातील 7.54 टक्के आणि वर्षभरापूर्वीच्या याच महिन्यातल्या 5.85 टक्क्यांच्या तुलनेत या महिन्यासाठी वार्षिक चलनवाढ 6.91 टक्के होती. त्याचप्रमाणे, अन्नधान्य महागाई मागील महिन्याच्या 11.87 टक्क्यांच्या तुलनेत 10.06 टक्के आणि वर्षभरापूर्वीच्या याच महिन्यात 6.46 टक्के होती.
Y-o-Y Inflation based on CPI-IW (Food and General)
All-India Group-wise CPI-IW for July, 2023 and August, 2023
Sr. No.
|
Groups
|
July, 2023
|
August, 2023
|
I
|
Food & Beverages
|
145.1
|
143.3
|
II
|
Pan, Supari, Tobacco & Intoxicants
|
156.3
|
156.6
|
III
|
Clothing & Footwear
|
138.0
|
138.4
|
IV
|
Housing
|
125.7
|
125.7
|
V
|
Fuel & Light
|
181.0
|
179.3
|
VI
|
Miscellaneous
|
132.8
|
133.7
|
|
General Index
|
139.7
|
139.2
|
CPI-IW: Groups Indices
ग्राहक किंमत निर्देशांक-औद्योगिक कामगार ची सप्टेंबर, 2023 महिन्याची आकडेवारी मंगळवार, 31 ऑक्टोबर, 2023 रोजी प्रसिद्ध केली जाईल. ती www.labourbureau.gov.in. या कार्यालयाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असेल.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1962533)
Visitor Counter : 210