उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

घटनात्मक संस्थांबाबत केल्या जाणाऱ्या अयोग्य वक्तव्या बद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली चिंता

Posted On: 29 SEP 2023 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023

काही लोक राजकीय दृष्टीकोन बाळगत  घटनात्मक संस्थांबद्दल अयोग्य वक्तव्य करतात, ही गोष्ट विचार, चिंतन आणि चिंता करण्याजोगी आहे असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.  असे वर्तन आपल्या सांस्कृतिक मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याचे सांगून त्यांनी अधोरेखित केले की, एखादी व्यक्ती जितकी उच्च पदावर असेल, तेवढे तिचे आचरण थोर  असायला हवे. राजकीय लाभ मिळवण्यासाठी एखादी टिप्पणी करणे चांगले नाही.

संवैधानिक संस्थांबद्दल प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवायला हवे, असे सांगून उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, घटनात्मक पदावर काम करणार्‍यांकडे आपण राजकीय दृष्टीकोनातून पाहता कामा नये, केवळ राजकीय लाभ मिळवण्यासाठी केलेले असे वर्तन स्वीकारार्ह  नाही.

बिहारमधील नालंदा विद्यापीठात आज आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या सभेला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, शिक्षणाच्या क्षेत्रात जगाने यापेक्षा प्रभावी आणि शक्तिशाली ब्रँड पाहिलेला नाही. नालंदा, कारण इतिहास आणि वारसा यासाठी जगात ओळख असलेल्या नालंदा विद्यापीठाला लोक केवळ नतमस्तक  होतात. हा वारसा तुम्हाला आणखी उंचावायचा  आहे.

शिक्षण ही सर्वात प्रभावी आणि परिवर्तन घडवून आणणारी यंत्रणा असल्याचे सांगून उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, जर जग बदलायचे असेल, समाजाची प्रगती करायची असेल, विषमता दूर करायची असेल आणि जर सर्वात वंचित घटका पर्यंत न्याय पोहोचवायचा असेल, तर ही गोष्ट केवळ ज्ञानच करू शकते.

उपराष्ट्रपतींच्या भाषणाचा संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे -

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1962203

 

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1962268) Visitor Counter : 106


Read this release in: English , Urdu