इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने सुरु असलेली भारताची वाटचाल केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडून अधोरेखीत
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2023 9:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023
कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी आज बंगाल वाणिज्य आणि उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या सहाव्या भारतीय आर्थिक परिषदेला संबोधित केले. आपल्या भाषणात चंद्रशेखर यांनी 2014 पासून भारतात झालेल्या परिवर्तनाचा आढावा घेतला तसेच जपान आणि जर्मनीला मागे टाकत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने सुरु असलेल्या भारताच्या वेगवान विकासावर भर दिला.
जगातील फ्राजाइल 5 राष्ट्र ते जगातील सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवताना आपण खूप अंतर पार केले आहे. आपण येत्या तीन वर्षात जपान आणि जर्मनीला मागे टाकून अव्वल 5 मधून अव्वल 3 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवू अशी हमी आपल्या पंतप्रधानांनी दिली आहे. आपल्या देशातील आर्थिक वृद्धी ही केवळ संख्याशास्त्रापुरती मर्यादित नाही, तर त्यामुळे केंद्र सरकारसाठी अतिशय महत्वाच्या अशा आरोग्य, शिक्षण आणि युवा भारतीयांसाठी रोजगार निर्मिती सारख्या क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक निधी दिला आहे.”
भारतातील शासनाबद्दल जागतिक दृष्टिकोनात आमूलाग्र बदल होत असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले. भारतात लोकशाही पद्धतीने सुरळीत कामकाज होऊ शकत नाही, असा जगाचा समज होता, विशेषतः चीनसारख्या हुकूमशाही राष्ट्रांचा. ही धारणा कित्येक वर्ष टिकून होती. 2015 मध्ये आपल्या पंतप्रधानांनी बदल घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून भारताबद्दलच्या या धारणेमध्ये परिवर्तन घडवून आणले. बंगाल वाणिज्य आणि उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या भारतीय आर्थिक परिषदेच्या माध्यमातून जगातील तिसऱ्या-सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत असलेली भारताची वाढ आणि भारत -प्रशांत कॉरिडॉरमधील महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962265)
आगंतुक पटल : 146