निती आयोग
azadi ka amrit mahotsav

भारताची सातत्यपूर्ण नवोन्मेष उत्कृष्टता: जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2023 मध्ये भारताने 40 वे स्थान कायम राखले

Posted On: 29 SEP 2023 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023

नीती आयोगाने भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि जिनिव्हा येथील जागतिक बौद्धिक संपदा संघटना (डब्ल्यूआयपीओ) यांच्या संयुक्त सहकार्याने भारतात जागतिक नवोन्मेष निर्देशांक (जीआयआय)2023 चे अनावरण केले. जगातील 132 देशांच्या अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत 40 वे स्थान कायम राखत भारताने नवोन्मेष विषयक अनेक मापदंडांच्या संदर्भात प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे. वर्ष 2015 मध्ये भारत या क्रमवारीत 81 व्या स्थानी होता, तेथून सध्याच्या स्थानापर्यंत झालेला लक्षणीय प्रवास देशाची उल्लेखनीय कामगिरी दर्शवतो.

या जीआयआय 2023 अनावरण कार्यक्रमाला  नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी; नीती आयोगाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जीआयआयचे सह-संपादक आणि डब्ल्यूआयपीओच्या  अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. साशा वुन्श-व्हिन्सेंट यांनी त्यांच्या तपशीलवार भाषणात भारताची, विशेषतः नीती आयोगाची प्रशंसा केली. जीआयआयच्या जागतिक क्रमवारीत सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावत ठेवल्याबद्दल त्यांनी देशाचे कौतुक केले. भारताची अनुकरणीय माहिती-आधारित नवोन्मेष प्रक्रिया आणि राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम यांचा त्यांनी ठळक उल्लेख केला.

जीआयआय 2023 मधील महत्त्वाचे घटक :

  1. भारताचा सातत्यपूर्ण चढता कल: वर्ष 2015 मधील 81व्या स्थानावरुन विद्यमान 40वे स्थान कायम राखण्यापर्यंत भारताने जीआयआय संदर्भात केलेल्या कामगिरीचा सतत चढता कल नवोन्मेषाप्रती भारताची अढळ कटिबद्धता अधोरेखित करतो. जीआयआयमध्ये सतत वरच्या स्थानाकडे झेप घेण्याचा हा कल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला अनुसरून असून तो नवोन्मेषाच्या माध्यमातून स्वावलंबित्व आणि लवचिकता प्राप्त करण्यावर अधिक भर देतो. 
  2. सहकाऱ्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता:  कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या एकूण 37 देशांच्या गटामधून भारत हा एकमेव देश ठळकपणे उदयाला आला आहे आणि मध्य तसेच दक्षिण आशियातील 10 अर्थव्यवस्थांच्या गटातील नवोन्मेषाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून समर्थपणे पुढे आला आहे.
  3. सातत्यपूर्ण नवोन्मेष उत्कृष्टता:  भारताने विकासाच्या पातळीशी संबंधित सर्व  अपेक्षांची पूर्तता करत  सलग 13 वर्षे नवोन्मेष साध्य करणारा हे स्थान कायम राखत सर्वांना प्रभावित करणे सुरु ठेवले आहे.
  4. सामर्थ्य आणि केंद्रित क्षेत्रे:  भारत बाजारपेठविषयक सुसंस्कृतपणा (इनपुट पिलर) आणि ज्ञान तसेच तंत्रज्ञान आऊटपुट (आऊटपुट पिलर) या श्रेणींमध्ये वरच्या स्थानी आहे. पायाभूत सुविधा आणि संस्थाविषयक पिलर्स (इनपुट पिलर्स) या घटकांच्या संदर्भात पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो.
  5. सर्वोच्च श्रेणीचे सूचक:  भारताने देशांतर्गत बाजारपेठ श्रेणी बीएन पीपीपी$ सूचकांक संदर्भात सर्वोच्च स्थानी आहे. तसेच पुढील 6 अतिरिक्त सूचकांच्या संदर्भात पहिल्या 10 स्थानांमध्ये भारताची वर्णी लागते: आयसीटी सेवा निर्यातएकूण व्यापार, व्हेन्चर कॅपिटल रिसीव्ह्ड, व्हॅल्यू, जीडीपी, स्टार्ट अप्स आणि  स्केलअप्ससाठी वित्तपुरवठा, देशांतर्गत उद्योग वैविध्य, युनिकॉर्न मुल्यांकन, जीडीपी, आणि अमूर्त मालमत्ता   विपुलता , सर्वोच्च  15,
  6. नवोन्मेष आऊटपुट:  भारत नवोन्मेष आऊटपुट संदर्भात, गेल्या वर्षीपेक्षा सुधारणा नोंदवत 35 व्या स्थानी आहे.
  7. विज्ञान आणि अभियांत्रिकी मधील उच्च पदवीधर:   भारत 2021 च्या तुलनेत विज्ञान आणि अभियांत्रिकी मधील एकूण दर्जात्मक पदवीधरांमध्ये 34%ची वाढ नोंदवत या सूचकांकात 11 व्या स्थानी आहे.
  8. स्टार्ट अप वित्तविषयक मान्यता:  भारतातील स्टार्ट अप्स आणि स्केलअप्स साठीचा वित्त पुरवठा या श्रेणीत देशाला 9 वे स्थान मिळवून देतो आहे, तर व्हेन्चर कॅपिटल मधील कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा थोडी घसरून देशाला 6 व्या नेऊन ठेवते आहे.
  9. वैविध्यपूर्ण देशांतर्गत उद्योग: भारताच्या देशांतर्गत उद्योग वैविध्यतेमध्ये वाढ दिसून येत आहे, गेल्या वर्षीपेक्षा ही वाढ 0.46% अधिक आहे आणि भारत यात 10 व्या स्थानी आहे.
  10. युनिकॉर्न मूल्यमापन:  भारताचे युनिकॉर्न मूल्यमापन 2023 मध्ये जीडीपीच्या 5.04% असून या बाबतीत भारत 9 व्या स्थानी आहे.
  11. उच्च तंत्रज्ञान विषयक उत्पादन:  वर्ष 2019 मधील देशात झालेल्या एकूण उत्पादन आऊटपुट पैकी उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादनांचा वाटा 34.23% आहे, आणि या निर्देशांकाच्या बाबतीत भारत 35 व्या स्थानी आहे.
  12. अमूर्त  मालमत्ता   विपुलता :  भारताने अमूर्त  मालमत्ता विपुलतेच्या बाबतीत प्रभावी असे 8 वे स्थान मिळवले आहे.
  13. सांस्कृतिक आणि सृजनात्मक निर्यात :   भारताची सांस्कृतिक आणि सृजनात्मक सेवा निर्यात 2021 मध्ये आधीच्या वर्षीपेक्षा 21.4% इतकी लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे भारत या वेगाने वाढत्या क्षेत्रात 18 व्या स्थानी पोहोचला आहे.

जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2023 चे भारतातील अनावरण नवोन्मेषाप्रती भारताची अढळ वचनबद्धता आणि जागतिक पातळीवरील नवोन्मेष क्षेत्रात नेतृत्वाच्या  दिशेने सुरु असलेला उल्लेखनीय प्रवास दर्शवते.भारत सातत्याने अपेक्षांहून अधिक सरस कामगिरी करत विविध निर्देशांकांच्या बाबतीत उत्तम कामगिरी करत असताना, नवोन्मेषाच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, लवचिकतेची जोपासना करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी ठामपणे वाटचाल करतो आहे.

जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2023 मधील अधिक माहिती आणि तपशील वाचण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा:

 https://www.wipo.int/global_innovation_index/en/2023/

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962234) Visitor Counter : 171


Read this release in: English , Urdu , Hindi