आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य यंत्रणांची सद्यस्थिती आणि सज्जतेचा घेतला आढावा
डेंग्यू प्रतिबंध आणि नियंत्रण केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली सूचना
Posted On:
27 SEP 2023 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज देशातील डेंग्यू संदर्भातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि देशातील डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेतला.
यावेळी मांडवीय यांना देशभरातील डेंग्यूच्या स्थितीबद्दल माहिती देण्यात आली. देशातील डेंग्यूच्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीचे आव्हान लक्षात घेता डेंग्यूविरोधात सज्ज राहण्याचे महत्व मांडवीय यांनी अधोरेखित केले. सर्व अधिकाऱ्यांनी पूर्ण तयारीनिशी डेंग्यूचा प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारने राज्यांना स्क्रीनिंग किटसाठी सर्व आवश्यक सहाय्य दिले असून फॉगिंग अर्थात जंतुनाशक फवारणी आणि आयईसी प्रक्रियांसाठी आर्थिक सहाय्य देखील दिले आहे, आरोग्यसेवक आणि कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षित केले आहे, असे डॉ मांडवीय यांनी सांगितले.
त्यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना डेंग्यू प्रतिबंध आणि नियंत्रण केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची सूचना केली.
डेंग्यूचा प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकारने राज्यांना कार्यक्रम अंमलबजावणी योजनेअंतर्गत पुरेसा निधी दिला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961393)
Visitor Counter : 104