माहिती आणि प्रसारण मंत्रालय

4k रिझोल्यूशनमधील चित्रपट पाहिल्यानंतर विजय आनंद यांचे चिरंजीव वैभव आनंद यांनी एनएफडीसी -भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली भेट

Posted On: 26 SEP 2023 10:00PM by PIB Mumbai

पुणे, 26 सप्टेंबर 2023

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ  - भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या  पुणे प्रेक्षागृहामध्ये सोमवार  25 सप्टेंबर रोजी ज्वेल थीफ चित्रपटाची  पुनर्संचयित आवृत्ती पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना सुखद धक्का बसला ,कारण दिग्दर्शक विजय आनंद यांचे चिरंजीव  वैभव आनंद मुंबईहून एनएफडीसी-एनएफएआय  येथे चित्रपट आणि चित्रपटाच्या पुनर्संचयनाची  प्रक्रिया पाहण्यासाठी आले होते.

दिग्गज सदाबहार  अभिनेते देव आनंद यांची जन्म शताब्दी साजरी करण्यासाठी, एनएफडीसी-एनएफएआय  त्यांच्या 7 अभिजात कलाकृती देशभरातील पीव्हीआर  आणि आयनॉक्स    येथे 23 आणि 24 सप्टेंबर रोजी फिल्म हेरिटेज फाऊंडेशनच्या सहकार्याने देशभरात  4 दिवसांमध्ये प्रदर्शित करत आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचा एक भाग म्हणून एनएफडीसी-एनएफएआयद्वारे पुनर्संचयित आणि  मुंबईत जुहू येथे प्रदर्शित केलेले   4k रिझोल्यूशनमधील चित्रपट वैभव आनंद यांनी सर्वप्रथम पाहिले.  या भेटीबद्दल बोलताना, एनएफडीसी-एनएफएआय मधील  अधिकाऱ्याने सांगितले की,''वैभव जी यांनी नमूद केले कीचित्रपटाची पुनर्संचयित आवृत्ती 60-70 वर्ष रिल्स जतन करून ठेवल्यानंतर देखील किती नवी कोरी  झाली हे पाहून ते थक्क झाले होतेआणि पुनर्संचयित  प्रक्रियेबद्दलही  जाणून घेण्यास उत्सुक होते. त्यामुळे हे सर्व पाहण्यासाठी  ते पुण्याला आले.

ते पुण्यात येत आहेत म्हटल्यावर एनएफडीसी-एनएफएआय इथल्या संबंधितांनी मोठा उत्साह दाखवला. ‘ज्वेल थीफ’ च्या प्रदर्शनाच्या आधी, आनंद जमलेल्या मंडळींना संबोधित करताना म्हणाले, भारत सरकारच्या पुढाकाराने राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाअंतर्गत पुनर्संचयित केलेल्या या चित्रपटांना अत्यंत  चांगला प्रतिसाद आहे. संग्रहालयात जाऊन  जुने चित्रपट कशाप्रकारे पुनर्संचयित केले जातात याचे  साक्षीदार होता आले त्याबद्दल मी भाग्यवान आहे.

देव आनंद यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या वारशाचा सोहळा सुरू ठेवण्यासाठी,   एनएफडीसी-एनएफएआयने मंगळवार, 26 सप्टेंबर ते रविवार, 1 ऑक्टोबर या कालावधीत एनएफडीसी-एनएफएआय परिसरात देव आनंद यांच्या चित्रपटांच्या उत्कृष्ट पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित केले आहे. वैभव आनंद यांनी जयकर बंगल्याच्या  खाजगी भेटीनंतर एका समारंभात या  प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले.

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1961105) Visitor Counter : 91


Read this release in: English