सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आज जागतिक सांकेतिक भाषा दिन साजरा


राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी दिव्यांग युवांच्या रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न अधोरेखित केले

भारतीय सांकेतिक भाषेत आर्थिक संज्ञा विषयक  260 चिन्हे; 10,000 आयएसएल शब्दकोश संज्ञा आणि कर्णबधिर समुदायासाठी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे व्हिडिओ रिले सेवेचा आज प्रारंभ

Posted On: 23 SEP 2023 6:50PM by PIB Mumbai

 

असे जग जिथे कर्णबधिर लोक सर्वत्र कुठेही संकेतांच्या मदतीने आपले म्हणणे मांडू शकतील! या संकल्पनेसह आज, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन विभागाअंतर्गत भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (ISLRTC), नवी दिल्ली तर्फे नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, जनपथ येथील भीम सभागृहात सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांनी  23 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन म्हणून घोषित केल्यापासून, भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी तो साजरा करते. दिव्यांगजन विभाग आणि भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने आपल्या सर्व विभागांमध्ये भारतीय सांकेतिक भाषेबद्दल समाजात सकारात्मक जागरूकता निर्माण करण्यासाठी या सांकेतिक भाषा दिनाच्या समारंभात अधिकाधिक नागरिक, भागधारक, सेवा-प्रदात्या संस्था, कर्णबधिर मुलांच्या शाळा, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते, कर्णबधिर नेते, शिक्षक, संशोधक इत्यादींना एकत्र आणले.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक या प्रमुख पाहुण्या तर  सचिव  राजेश अग्रवाल सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सहसचिव राजेश यादव, आणि संचालक मृत्युंजय झा आणि नॅशनल असोसिएशन ऑफ डेफ, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ डेफ, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ डेफ फॉर वुमनचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री  प्रतिमा भौमिक यांनी भारतीय सांकेतिक भाषेत मन की बातसुरू व्हायला हवी असे नमूद केले. दिव्यांग युवकांसाठी रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी दिव्यांग व्यक्तींना रोजगार देण्यासाठी विभागाने  घेतलेल्या पुढाकाराबद्दल माहिती दिली तसेच विभाग मूकबधिर विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेत शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यास सक्षम करण्यासाठी टॅब्लेट प्रदान करण्याचा विचार करत असल्याचे नमूद केले.

विभागाचे सहसचिव राजेश यादव यांनी सर्व मान्यवरांचे आणि सहभागींचे स्वागत केले. ते म्हणाले की आयएसएलआरटीसी एक व्यासपीठ विकसित करण्यासाठी पुढाकार घेईल जिथे कर्णबधिर सहज संवाद साधू शकतील. तसेच आयएसएलआरटीसी इयत्ता सातवी आणि त्यापुढच्या एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांच्या अनुवादावर काम करेल असे ते म्हणाले.

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ डेफ चे अध्यक्ष सुनील सहस्रबुद्धे  यांनी गेल्या 8 वर्षांतील आयएसएलआरटीसीच्या लक्षणीय वाढीचे कौतुक केले.

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ द डेफ वुमन च्या अध्यक्ष उमा कपूर म्हणाल्या की सर्व पालकांनी ऑनलाइन स्वयं-शिक्षण आयएसएल अभ्यासक्रम शिकला पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या कर्णबधिर मुलांशी संवाद साधू शकतील.

नॅशनल असोसिएशन ऑफ डेफ चे अध्यक्ष ए.एस. नारायण  म्हणाले की सांकेतिक भाषा दिनाच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी सरकार, इंडिया गेटसारख्या मध्यवर्ती ठिकाणी निळा प्रकाश प्रदर्शित करत आहे.

कार्यक्रमादरम्यान खालील उपक्रम  आणि सामग्रीचा शुभारंभ करण्यात आला .

  • भारतीय सांकेतिक भाषेतील मूलभूत संप्रेषण कौशल्ये हा ऑनलाइन स्वयं-शिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. भारतीय सांकेतिक भाषेतील मूलभूत संवाद कौशल्ये वाढवणे हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हे कर्णबधिर मुलांच्या पालकांसाठी, भावंडांसाठी, शिक्षकांसाठी आणि भारतीय सांकेतिक भाषेचे मूलभूत ज्ञान घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींसाठी तयार केले आहे. अभ्यासक्रमात 10 मॉड्यूल्सचा समावेश आहे, ज्यामध्ये 30 आवश्यक विषयांचा समावेश आहे, जे  मूलभूत भारतीय सांकेतिक भाषेतील संवादाचे सर्वसमावेशक आकलन सुनिश्चित करते.
  • आयएसएलआरटीसी, सोसायटी जनरल आणि वी-शेष यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या भारतीय सांकेतिक भाषेतील आर्थिक संज्ञांची 260 चिन्हे जारी करण्यात आली. आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रात काम करणार्‍या कर्णबधिर लोक आणि अन्य लोकांना परस्परांशी संवाद साधण्यासाठी आर्थिक संज्ञांची चिन्हे विकसित केली आहेत. या प्रकल्पामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या कर्णबधिर युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल.
  • संकेतस्थळावर 10,000 ISL शब्दकोश संज्ञा जारी करण्यात आल्या.
  • कर्णबधिरांसाठी विशेष शाळांमध्ये आयएसएल अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.

व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे कर्णबधिर समुदायासाठी व्हिडिओ रिले सेवा सुरू करण्यात आली. व्हिडिओ रिले सेवा ही एक व्हिडिओ दूरसंचार सेवा आहे जी कर्णबधिर लोकांना दूरस्थ सांकेतिक भाषा दुभाषीच्या माध्यमातून सर्वसाधारण लोकांशी संवाद साधण्यास सक्षम करते.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1960015) Visitor Counter : 129


Read this release in: English , Urdu , Hindi