संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदल (आयएन) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बंगळूरू यांच्यात तांत्रिक सहयोग, संयुक्त संशोधन आणि विकासाबाबत सामंजस्य करार

Posted On: 22 SEP 2023 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2023

भारतीय नौदल (आयएन) आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), बंगळूरू यांच्यात नवी दिल्ली येथे तांत्रिक सहयोग आणि संयुक्त संशोधन आणि विकासाबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित विविध शाखांमधील शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देणे, संरक्षण क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानाबाबत वैज्ञानिक समज वाढवणे आणि नवीन विकास उपक्रम हाती घेणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

भारती नौदल (आयएन) आणि भारतीय विज्ञान संस्थेचे (आयआयएससी) संरक्षण तंत्रज्ञानाशी संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रामधील वैज्ञानिक संशोधन उपक्रमांची शैक्षणिक देवाणघेवाण करण्यामध्ये सामायिक हित आहे.

हा सामंजस्य करार एक व्यापक चौकट प्रदान करेल आणि दोन्ही बाजूंना क्षमता विकास वाढवणे, क्षेत्रीय स्तरावरील समस्यांचे निराकरण करणे, उपकरण विक्रेत्यांचा आवाका वाढवणे, आणि प्राध्यापक/अतिथी व्याख्यानांच्या देवाणघेवाणीद्वारे प्रभावी प्रशिक्षण देणे, यासाठी सक्षम करेल. आयएन ने आयआयएससी च्या सहकार्याने भविष्यासाठी सज्ज ‘ट्रान्स क्रिटिकल कार्बन डायऑक्साइड’  (CO2) आधारित नैसर्गिक रेफ्रिजरंटवर काम करणार्‍या एसी प्लांटचा विकास हाती घेतला आहे. हे तंत्रज्ञान हॅलोन सिंथेटिक रेफ्रिजरंट्सचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्याच्या दिशेने मिळवलेले मोठे यश असून, ते स्वदेशात डिझाईन आणि विकसित करण्यात आले आहे. हा सामंजस्य करार नजीकच्या भविष्यात अशा प्रकारचे तंत्रज्ञान उपाय विकसित करण्यासाठी सतत सहकार्य करण्यासाठीचा औपचारिक पाया आहे.

या करारावर भारतीय नौदलाच्या वतीने रिअर डमिरल के श्रीनिवास, मटेरियलचे सहाय्यक प्रमुख (डॉकयार्ड आणि रिफिट) यांनी, आणि कॅप्टन श्रीधर वॉरियर (निवृत्त), रजिस्ट्रार आयआयएससी आणि प्रो बी गुरुमूर्ती, संचालक एफएसआयडी बंगळूरू यांनी स्वाक्षरी केली.

 S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1959748) Visitor Counter : 100


Read this release in: English , Urdu , Hindi