दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स आणि सीएसआयआर - राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा यांच्यात दूरसंचार क्षेत्रासाठी ‘NAVIC’ आधारित भारतीय प्रमाण वेळ शोधण्यायोग्य ‘प्राथमिक संदर्भ वेळ घड्याळा’च्या विकासाबाबतच्या करारावर स्वाक्षरी
Posted On:
20 SEP 2023 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2023
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT), हे दूरसंचार विभागाचे (DoT) प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र आणि सीएसआयआर -राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (NPL) यांनी दूरसंचार क्षेत्रासाठी NavIC आधारित आयएसटी --ट्रेसेबल, अर्थात भारतीय प्रमाण वेळ शोधण्यायोग्य प्राइमरी रेफरन्स टाइम क्लॉक (PRTC) म्हणजेच प्राथमिक संदर्भ घड्याळ विकसित करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली.
दूरसंचार विभागाच्या दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी (TTDF) योजने अंतर्गत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारे ब्रॉडबँड आणि मोबाइल सेवा सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञान डिझाईन, विकास, दूरसंचार उत्पादनांचे व्यापारीकरण आणि उपाय या क्षेत्रात काम करणाऱ्या देशांतर्गत कंपन्या आणि संस्थांना निधी सहाय्य प्रदान करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
हा प्रकल्प अशा उपकरणाच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो, जे ± 20 एनएसच्या आत येणारे सर्व दूरसंचार सेवा प्रदाते (टीएसपी) आणि इंटरनेट सेवा प्रदाते (आयएसपी) यांना थेट भारतीय प्रमाण वेळ (IST) शोधण्याची क्षमता प्रदान करेल. भारताला याचा GPS वरील अवलंबित्व कमी करण्यासह, अनेक मार्गांनी फायदा होईल.
दूरसंचार नेटवर्कचे टाइम सिंक्रोनाइझेशन, हा मजबूत सायबर सुरक्षित देश बनण्याच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असेल, कारण प्रत्येक बँक व्यवहार, शेअर बाजारातील व्यवहार आणि माहितीची देवाणघेवाण TSP आणि ISP द्वारे होते.
करारावर स्वाक्षरी करण्याच्या समारंभात बोलताना सी- डॉटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजकुमार उपाध्याय यांनी भारताच्या संशोधन आणि विकास क्षेत्रामधील अफाट क्षमतेचा विशेष उल्लेख केला. “आत्मनिर्भर भारता”चे स्वप्न साकार करण्यासाठी परस्पर हिताच्या इतर क्षेत्रात सहकार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
* * *
S.Bedekar/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959221)
Visitor Counter : 114