वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अखिल भारतीय घाऊक किंमतींवर आधारित वार्षिक चलनफुगवठ्याचा दर ऑगस्ट 2023 महिन्यासाठी (-) 0.52% (तात्पुरता) आहे. जुलै, 2023 मध्ये तो (-) 1.36% होता. प्रामुख्याने खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कापड आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे चलन फुगवट्याचा दर राहिला नकारात्मक


ऑगस्ट 2023 (आधारभूत वर्ष: 2011-12) महिन्यासाठी भारतातील घाऊक किमतीचे निर्देशांक

Posted On: 14 SEP 2023 12:00PM by PIB Mumbai

अखिल भारतीय घाऊक किंमतींवर आधारित वार्षिक चलनफुगवठ्याचा दर (डब्लूपीआय) ऑगस्ट 2023 महिन्यासाठी (-) 0.52% (तात्पुरता) आहे. जुलै, 2023 मध्ये तो  (-) 1.36% होता. ऑगस्ट 2023 मधील चलन फुगवट्याचा दर  प्रामुख्याने खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कापड आणि खाद्यपदार्थ यांच्या किमतीत घट झाल्यामुळे नकारात्मक राहिला. सर्व वस्तू आणि डब्लूपीआय घटकांचे मागील तीन महिन्यांचे निर्देशांक आणि चलनफुगवट्याचे दर खाली दिले आहेत:

निर्देशांक संख्या आणि चलनफुगवट्याचा वार्षिक दर (% मध्ये Y-o-Y)*

2. ऑगस्ट, 2023 मध्ये डब्लूपीआय निर्देशांकातील दरमहा बदल जुलै, 2023 च्या तुलनेत 0.33% इतका होता. गेल्या सहा महिन्यांतील डब्लूपीआय निर्देशांकातील मासिक बदल खाली सारांश स्वरुपात दिला आहे:

दरमहा (% मध्ये M-o-M) डब्लूपीआय निर्देशांक# मधील बदल

3. डब्लूपीआय च्या प्रमुख गटांमध्ये दरमहा बदल:

i. प्राथमिक वस्तू (वजन 22.62%):- या प्रमुख गटाचा निर्देशांक जुलै, 2023 च्या 190.5 (तात्पुरत्या) वरून ऑगस्ट, 2023 मध्ये 0.47% ने घसरून 189.6 (तात्पुरता) झाला.

ii.   इंधन आणि उर्जा (वजन 13.15%):- या प्रमुख गटाचा निर्देशांक जुलै 2023 महिन्याच्या 145.3 (तात्पुरत्या) वरून ऑगस्ट, 2023 मध्ये 2.96% ने वाढून 149.6 (तात्पुरता) झाला आहे. जुलै 2023 च्या तुलनेत ऑगस्ट, 2023 मध्ये खनिज तेलाच्या किमतीत (4.02%) आणि वीजदरात (1.79%) वाढ झाली. 

iii उत्पादित माल (वजन 64.23%):- या प्रमुख गटाचा निर्देशांक 2023 च्या जुलै महिन्याच्या 139.6 (तात्पुरता) वरून ऑगस्ट, 2023 मध्ये 0.14% ने वाढून 139.8 (तात्पुरता) झाला आहे. 22 एनआयसी दोन-अंकी गटांपैकी उत्पादित मालासाठी, 15 गटांच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे तर 6 गटांच्या किंमती कमी झाल्या आहेत.

4. घाऊक किंमत निर्देशांक डब्ल्यूपीआय अन्न निर्देशांक (वजन 24.38%): प्राथमिक जिन्नस गटातील 'अन्न पदार्थ’ आणि उत्पादित माल गटातील 'अन्न उत्पादन' यांचा समावेश असलेला अन्न निर्देशांक जुलै, 2023 मधील 187.7 वरून ऑगस्ट, 2023 मध्ये 186.1 वर घसरला. डब्ल्यूपीआय अन्न निर्देशांकावर आधारित चलनफुगवटा जुलै, 2023 मधील 7.75% वरून ऑगस्ट, 2023 मध्ये 5.62% पर्यंत घसरला.

5. जून, 2023 महिन्यासाठी अंतिम निर्देशांक (आधारभूत वर्ष: 2011-12=100): जून, 2023 महिन्यासाठी अंतिम घाऊक किंमत निर्देशांक आणि 'सर्व प्रकारच्या वस्तू'साठी महागाई दर (आधारभूत वर्ष: 2011-12=100) अनुक्रमे 148.9 आणि (-) 4.18% होते. अद्ययावत आकडेवारीवर आधारित विविध कमोडिटी अर्थात विक्रेय वस्तू गटांसाठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाई दरांचे तपशील परिशिष्ट I मध्ये दिले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील विविध विक्रेय वस्तू गटांसाठी डब्ल्यूपीआय वर आधारित वार्षिक महागाई दर (वर्षागणिक) परिशिष्ट II मध्ये दिला आहे. मागील सहा महिन्यांतील विविध कमोडिटी गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांक परिशिष्ट III मध्ये दिला आहे.

6. प्रतिसाद दर: ऑगस्ट, 2023 साठी घाऊक किंमत निर्देशांक हा 85.7 टक्के भारित प्रतिसाद दराने संकलित केला गेला आहे, तर जून, 2023 साठी अंतिम आकडेवारी 94.6 टक्के भारित प्रतिसाद दरावर आधारित आहे. डब्ल्यूपीआय च्या अंतिम दुरुस्ती धोरणानुसार डब्ल्यूपीआयच्या तात्पुरत्या आकडेवारीत सुधारणा केली जाईल. हे प्रसिद्धीपत्रक, वस्तू निर्देशांक आणि महागाईची आकडेवारी आमच्या होम पेज http://eaindustry.nic.in वर उपलब्ध आहेत.

7. प्रसिद्धिपत्रकाची पुढील तारीख: सप्टेंबर, 2023 महिन्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक 16/10/2023 रोजी प्रसिद्ध होईल.

***

S.Thakur/V.Ghode/V.Joshi/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1957287) Visitor Counter : 84


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri