सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या विकास आणि कल्याण मंडळाच्या प्रशासकीय मंडळाच्या नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी
Posted On:
12 SEP 2023 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2023
विमुक्त, भटके आणि अर्ध-भटके समुदाय संबंधित विकास आणि कल्याण मंडळाचे अध्यक्ष (डीडब्लूबीडीएनसी) आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या सचिवांनी, डीडब्लूबीडीएनसी च्या नवनियुक्त सदस्यांना शपथ दिली. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने विमुक्त, भटके आणि अर्ध-भटक्या समुदायांसाठी (डीडब्लूबीडीएनसी)21-02-2019 मध्ये विकास कल्याण मंडळाची स्थापना केली आहे.

भरतभाई बाबूभाई पटानी, नवीन नियुक्त सदस्यांपैकी एक असून, ते अनेक दशकांपासून गुजरात राज्यातील विमुक्त जमातींच्या (डीएनटी) समुदायांसोबत काम करत आहेत. अन्य नियुक्त सदस्यांपैकी प्रवीण शिवाजीराव घुगे यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

शपथविधी झाल्यानंतर प्रशासकीय मंडळाने डीएनटी च्या आर्थिक सबलीकरणाच्या योजनेच्या कार्यान्वयनासाठी रणनीती यासह विविध मुद्यांवर चर्चा केली. चालू आर्थिक वर्षात 40.00 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीसह या सदस्यांसाठी गृहनिर्माण, उपजीविका निर्मिती, शैक्षणिक सक्षमीकरण आणि आरोग्य प्रदान करण्यासंबंधित ही केंद्रीय क्षेत्र योजना आहे. डीएनटी समुदायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्र सरकारची इतर मंत्रालये/विभाग यांचा ताळमेळ सुनिश्चित करणे हा या चर्चेचा मुख्य उद्देश होता.
* * *
N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1956636)