अर्थ मंत्रालय

सरकारी कार्यालयांत स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा यांच्यासाठी सुरु केलेल्या विशेष मोहीम 2.0 अंतर्गत डिसेंबर 2022 ते जुलै 2023 या काळात सीबीडीटीने 46,000 सार्वजनिक तक्रारी आणि 7,000 अपिलांचे केले निराकरण


येत्या 2 ऑक्टोबर 2023 पासून सीबीडीटीची विशेष मोहीम 3.0 सुरु होणार

Posted On: 11 SEP 2023 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 सप्‍टेंबर 2023

 

सरकारी कार्यालयांमध्ये सार्वजनिक  स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा यांच्यासाठी केंद्र सरकारने 2 ऑक्टोबर 2022 पासून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत विशेष मोहीम 2.0 ची अंमलबजावणी केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयकर विभागातील इतर दुय्यम कार्यालयांसह या विशेष मोहीम 2.0 मध्ये उत्साहाने भाग घेतला.

या विशेष मोहीम 2.0 च्या प्रेरणेसह कार्य करत, सीबीडीटीने या मोहिमेदरम्यान जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी सकारात्मक पावले टाकत पुढे जाण्याचा निश्चय केला. याचाच भाग म्हणून, विभागाने डिसेंबर, 2022 ते जुलै, 2023 या कालावधीत सीपीजीआरएएमएस पोर्टलवर नोंदवण्यात आलेल्या 46,000 सार्वजनिक  तक्रारींचे निवारण केले तसेच तक्रारींच्या संदर्भातील या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या  सुमारे 7,000 अपिलांवर कार्यवाही केली.

विशेष मोहीम 2.0 अंतर्गत, सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान सीमेवर, अटारी येथे सूक्ष्म वनांच्या मालिकेचे रोपण तसेच उद्घाटन करुन हरित आच्छादन वाढवण्याच्या उद्देशाने हरित आयकर (आयकर विभागातर्फे करण्यात आलेला हरियाली साध्य ठराव) हा नवा उपक्रम सुरु करण्यात आला. आयकर विभागाच्या इमारतींच्या परिसरातील तसेच आसपासच्या जागा तसेच इतर सार्वजनिक स्थानांवर हिरवाई वाढवण्यासाठी तसेच सूक्ष्म वनांची निर्मिती करण्यासाठी, हरित आयकर उपक्रमाची उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दिशेने काम करण्याची आग्रही विनंती गुप्ता यांनी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना केली.

त्यानुसार, हरित आयकर मोहिमेअंतर्गत, डिसेंबर, 2022 ते जुलै, 2023 या कालावधीत 103 सूक्ष्म वने निर्माण करण्यात आली. देशभरात लावण्यात आलेल्या या सूक्ष्म वनांनी दीड लाख वर्ग फुट क्षेत्राहून अधिक जागा व्यापली आहे. तसेच, अधिकृत कार्यक्रमांसाठी विभागाच्या कार्यालयात येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत करताना त्यांना कुंडीत लावलेले रोपटे अथवा जैवविघटनकारी पदार्थांमध्ये गुंडाळलेली फुलाची फांदी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

सध्या सुरु असलेली मोहीम पुढे सुरु ठेवत, सीबीडीटीने विशेष मोहीम 3.0 ची जोरदार तयारी सुरु केली आहे. ही मोहीम 2 ऑक्टोबर, 2023 पासून सुरु होणार आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1956486) Visitor Counter : 83


Read this release in: English , Urdu , Hindi