संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नौदल कमांडर्स परिषद- 2023 चे दुसरे सत्र - संरक्षण राज्यमंत्र्यांचा वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांशी संवाद

Posted On: 04 SEP 2023 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2023

 

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी नवी दिल्ली येथे 4 सप्टेंबर 23 रोजी सुरू झालेल्या द्विवार्षिक नौदल कमांडर्स परिषदेत वरिष्ठ नौदल नेतृत्वाशी संवाद साधला. 2023 पासून दिल्लीबाहेर कमांडर्स परिषद होत असून पहिले  सत्र  मार्च 2023 मध्ये आयएनएस विक्रांत जहाजावर आयोजित करण्यात आले  होते. आज सुरू झालेले  दुसरे सत्र, पहिल्या सत्रात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी आहे.

या संवादादरम्यान, संरक्षण राज्यमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि समृद्धीसाठी सुरक्षित समुद्र सुनिश्चित करण्यासाठी उच्च  परिचालन क्षमता  राखल्याबद्दल नौदलाचे कौतुक केले. 2047 पर्यंत संपूर्ण आत्मनिर्भर दल बनण्याच्या दिशेने स्वदेशीकरण आणि अभिनव प्रयत्नांबद्दल त्यांनी नौदलाचे कौतुक केले. याचे उदाहरण अलीकडेच विंध्यगिरी आणि महेंद्रगिरी या स्वदेशी युद्धनौकांच्या जलावतरणातून पाहायला मिळाले  आहे. पंतप्रधानांनी सांगितलेल्या पंच प्रणच्या अनुषंगाने सातत्याने उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांनी नौदलाचे कौतुक केले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, डीआरडीओ सचिव डॉ. समीर व्ही कामत आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील उद्घाटन सत्राला  उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात नौदल प्रमुख ऍडमिरल  आर हरी कुमार यांनी अधोरेखित केले  की “राष्ट्राच्या सागरी सामर्थ्याचे साधन म्हणून, आपण आपल्या मार्गात येणारे प्रत्येक ध्येय आणि प्रत्येक मोहीम  पूर्ण केली  पाहिजे. दुसरे म्हणजे, 'सागर'(SAGAR-क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास ) संकल्पनेच्या  अनुषंगाने आपण हिंद महासागर क्षेत्रात आणि त्यापलीकडे मोठ्या प्रमाणात सागरी वाहतूक हाताळण्यासाठी सज्ज असायला हवे. तिसरे, आपल्या उदयोन्मुख देशाची शक्ती म्हणून, आपण आपल्या आजूबाजूला होत असलेल्या मोठ्या सामाजिक बदलांचा अंगीकार करायला हवा. चौथे, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण  चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि अन्य  दोन दलांसोबत एकत्रितपणे काम करत आहोत.''

(Extracts of RRM Speech)

* * *

S.Kakade/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954751) Visitor Counter : 110


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil