उपराष्ट्रपती कार्यालय

भारताच्या पहिल्या सौर अभियानातील आदित्य-एल1 यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपतींनी केले इस्रो चे अभिनंदन

Posted On: 02 SEP 2023 4:18PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती, जगदीप धनखड यांनी आज भारताच्या पहिल्या सौर अभियानातील आदित्य-एल1 यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत केले आणि ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमधील (इस्रो) शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचे अभिनंदन केले. आशावाद व्यक्त करताना, त्यांनी या मोहिमेमुळे सौरमालेबद्दलची आपली समज मोठ्या प्रमाणात वाढेल यावर भर दिला.

एक्स पोस्टमध्ये, उपराष्ट्रपती म्हणाले;

भारताच्या पहिल्या सौर अभियानातील आदित्य-एल1 यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाद्वारे आपल्या अंतराळ प्रवासात एक गौरवशाली नवा अध्याय उलगडला आहे!

हा उल्लेखनीय मैलाचा टप्पा गाठल्याबद्दल मी @isro मधील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन करतो. या अवकाशीय यशामुळे आपल्या सौरमालेच्या आकलनात नक्कीच भरीव योगदान लाभेल.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1954406) Visitor Counter : 107


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil