शिक्षण मंत्रालय

1 ते 8 सप्टेंबर 2023 दरम्यान शिक्षण मंत्रालयाकडून 'उल्लास'- नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत साक्षरता सप्ताहाचे आयोजन

Posted On: 01 SEP 2023 7:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

'उल्लास'- नवभारत साक्षरता कार्यक्रम याबाबत सर्व हितधारक/लाभार्थी/नागरिक यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्‍त 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान साक्षरता सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. एक आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमामुळे देशातील प्रत्येक नागरिकामध्ये कर्तव्यबोध आणि जनभागीदारीची भावना वाढीला लावण्यासाठी लोकसहभागाला चालना मिळेल. या दृष्टीकोनामुळे ही योजना लोकप्रिय होईल आणि भारताला पूर्णपणे साक्षर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होईल. साक्षरता सप्ताहामध्ये  (खाली दिल्यानुसार) विविध कार्यक्रमांचे आयोजन होईल. त्यानंतर 8 सप्टेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात येईल.

'उल्लास' मोबाईल ऍपविषयी अध्ययनकर्ते आणि स्वयंसेवक यांच्या नोंदणीच्या संख्येत वाढ करणे हे देखील या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सरकारी/ अनुदानित शाळांचे विद्यार्थी, सीबीएसई संलग्न शाळा, एनव्हीएस, केव्हीएस, एनसीटीई अंतर्गत अध्यापक प्रशिक्षण संस्था, एका विद्यापीठाखालील/ एआयसीटीई खालील उच्च शिक्षण संस्था( पदवी महाविद्यालये/ तांत्रिक संस्था), स्काऊट्स आणि गाईड, एनवायकेएस,एनसीसी, एनएसएसचे स्वयंसेवक, अंगणवाडी कर्मचारी, ग्राम पंचायती, शेतकरी, महिला, निवृत्त कर्मचारी, आयसीडीएस/ एक थांबा केंद्र, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, बचत गट, नवसाक्षर, निरक्षर इ. आणि देशातील नागरिक या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

2022-27 या आर्थिक वर्षात अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांसाठी शिक्षण यावरील उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रम या केंद्र सरकार पुरस्कृत योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या योजनेचे प्रामुख्याने पाच घटक आहेत.

1) मूलभूत साक्षरता आणि आकडेमोडीचे ज्ञान 2) महत्त्वाची जीवन कौशल्ये 3) मूलभूत शिक्षण 4) व्यावसायिक कौशल्ये 5) शिक्षण सुरू ठेवणे

या योजनेचे बोधचिन्ह, जन जन साक्षर हे घोषवाक्य/ टॅगलाईन आणि नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे उल्लास(Understanding of Lifelong Learning for All in Society) हे लोकप्रिय नाव यांचे उद्घाटन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 29 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या तिसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.

साक्षरता सप्ताहात होणारे कार्यक्रम

1) 'उल्लास'- नवभारत साक्षरता कार्यक्रम याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी आणि जिल्हा साक्षरता मोहीम प्राधिकरणाच्या बैठका 

2) 'उल्लास'- नवभारत साक्षरता कार्यक्रमासंदर्भात पंचायत राज संस्थांना सहभागी करण्यासाठी ग्राम पंचायतींच्या बैठका

3) 'उल्लास'- नवभारत साक्षरता कार्यक्रमासंदर्भात विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून बॅनर्स आणि घोषवाक्यांसोबत रॅली/ सायकल रॅली/प्रभात फेऱ्या/ पथनाट्ये इ.

4) 'उल्लास'- नवभारत साक्षरता कार्यक्रमासंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा/परिषदा/ चर्चासत्रांचे आयोजन

5) रेडियो जिंगल्स आणि लघुपट

6) सार्वजनिक ठिकाणी भित्तीचित्रे, पोस्टर्स  यांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून तसेच पोस्टर्स, पत्रकांच्या वाटपातून जनजागृती

7) वृक्षारोपण मोहीम, पर्यावरण जागृतीबाबत, स्वच्छता मोहिमांबाबत हितधारकांकडून वाद-विवाद, परिसंवादांचे आयोजन

 

S.Bedekar/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1954184) Visitor Counter : 1576


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi