संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संरक्षण विषयक संबंधांचा आढावा घेण्यासाठी 02 आणि 03 सप्टेंबरला श्रीलंकेच्या दौऱ्यावर
Posted On:
01 SEP 2023 3:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 02 आणि 03 सप्टेंबर 2023 रोजी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या दौऱ्यामध्ये राजनाथ सिंह श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षण मंत्री रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान दिनेश गुणवर्देना यांच्याशी चर्चा करतील. या बैठकीत श्रीलंकेबरोबरच्या भारताच्या संरक्षण संबंधांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मंत्री मध्य श्रीलंकेतील नुवारा एलिया आणि पूर्व भागातील त्रिंकोमाली येथेही भेट देतील. राजनाथ सिंह यांचा हा दौरा श्रीलंकेबरोबरचे सध्याचे घनिष्ट आणि मैत्रीपूर्ण संबंध आणखी पुढे नेण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल. दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1954015)
Visitor Counter : 165
Read this release in:
Tamil