सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी

Posted On: 30 AUG 2023 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्ट 2023

 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ  यांनी 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून  महत्त्वपूर्ण सहकार्याचा पाया  रचला आहे. सफाई कर्मचारी, हाताने मैला उचलणारे, कचरा वेचक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांचे सामाजिक-आर्थिक उत्थान  आणि देशभरातील या उपेक्षित समुदायांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणे हा या धोरणात्मक भागीदारीचा उद्देश आहे.

सामंजस्य करार लक्ष्यित कल्याणकारी कार्यक्रमांसाठी निधीचे प्रभावी वाटप आणि वापराद्वारे समावेशक विकासाला गती देण्याप्रतीची  वचनबद्धता  अधोरेखित करतो. सुरक्षितता, शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता आणि शाश्वत रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देणारे उपक्रम वाढवण्याचा हा संयुक्त प्रयत्न  आहे, ज्यामुळे या कामगारांच्या सर्वांगीण प्रगतीला  हातभार लागू शकेल. हे कामगार  आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रतिकूल हवामानात कठोर परिश्रम करतात.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ ही समर्पित  प्रमुख संघटना असून वाटप केलेल्या निधीचा पारदर्शक आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाच्या बरोबरीने सहकार्य करेल.  उपेक्षित लोकसंख्येला सक्षम करणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कौशल्य आणि संसाधने यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न दोन्ही संस्था करतील.

या सामंजस्य करारावर स्वाक्षरी हा समान संधी आणि सामाजिक प्रगतीला चालना देण्याच्या सामायिक दृष्टीकोनाचा दाखला आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ  सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी  सामूहिक प्रयत्नांना चालना देण्यास उत्सुक आहेत, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला पुढे जाण्याची समाधी मिळेल आणि देशाच्या विकासात  ते योगदान देऊ शकतील  असे वातावरण निर्माण  केले जाईल.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953606) Visitor Counter : 116


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu