संरक्षण मंत्रालय

इजिप्तमधील कैरो हवाई तळावर भारतीय वायुदलाचा ब्राईट स्टार-23 युद्धसरावात सहभाग

Posted On: 27 AUG 2023 9:18AM by PIB Mumbai

 

इजिप्तच्या कैरो (पश्चिम) हवाई तळ इथे 27 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2023 दरम्यान होत असलेल्या ब्राईट स्टार-23 या द्वैवार्षिक बहुस्तरीय त्रिसेवा युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय वायुदलाच्या (IAF)  तुकडीने आज उड्डाण केले.

भारतीय वायुदल पहिल्यांदाच ब्राईट स्टार-23 मध्ये सहभागी होत असून यात अमेरिका, सौदी अरेबिया, ग्रीस आणि कतारच्या तुकड्याही सहभागी होत आहेत. भारतीय वायुदलाच्या तुकडीत पाच MiG-29, दोन IL-78, दोन C-130 आणि दोन C-17 विमानांचा समावेश आहे. भारतीय वायुदलाच्या गरुड विशेष दलाचे जवान तसंच 28, 77  78 आणि 81 या तुकड्यांमधील जवानही या युद्धसरावात सहभागी होत आहेत. भारतीय लष्कराच्या दीडशे जवानांनाही आपल्या सोबत घेऊन भारतीय वायुदलाचे परिवहन विमान उड्डाण करणार आहे.

या युद्धसरावाचा उद्देश हा संयुक्त कसरतींचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी घडवून आणणे हा आहे. सीमेपलीकडल्या देशांमध्ये परस्पर संबंध स्थापित करण्यासोबतच सहभागी देशांचे धोरणात्मक संबंध या कसरतींमुळे दृढ व्हायला सहाय्य मिळणार आहे. भारतीय वायुदलाची सरावासाठी परदेशात उड्डाण करत असलेली तुकडी ही वायुदलाच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या समकक्ष मानली जात आहे.

भारत आणि इजिप्त मध्ये या आधीही 1960 दरम्यान दोन्ही देश हवाई इंजिनाचा आणि विमानाचा विकास करत असताना विशेषत्वाने संबंध आणि प्रगाढ सहकार्य प्रस्थापित झाले होते. त्यावेळी, इजिप्तच्या वैमानिकांना भारतीय समकक्ष वैमानिकांनी प्रशिक्षणही दिले होते. या दोन सुसंस्कृत देशांमधले नातेसंबंध नुकत्याच झालेल्या दोन्ही देशांच्या वायुदल प्रमुखांच्या भेटींमधून तसेच भारतीय संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांच्या इजिप्त भेटीनंतर आणखी प्रगल्भ झाले आहेत. या दोन्ही देशांनी त्यांच्या सशस्त्र दलांचे संयुक्त प्रशिक्षण नियमित युद्धसरावांच्या सहाय्याने आणखी मजबूत केले आहे.

***

N.Joshi/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952644) Visitor Counter : 167


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu