कायदा आणि न्याय मंत्रालय

कायदा मंत्र्यांच्या हस्ते टेलि-लॉ 2.0 चे अनावरण


देशभरात 50 लाख खटला - पूर्व कायदेशीर  सल्ल्यांची सुविधा

Posted On: 25 AUG 2023 6:36PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीत आयोजित एका महत्वपूर्ण  कार्यक्रमात, कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाच्या टेली-लॉ कार्यक्रमाच्या विस्ताराचा  एक महत्त्वाचा अध्याय म्हणून आज  टेलि-लॉ 2.0 उपक्रम सुरू करण्यात आला. दिशा (DISHA )योजनेंतर्गत कार्यान्वित असलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाने, 50 लाख कायदेशीर सल्ले प्रदान करून , देशाच्या कानाकोपऱ्यात न्याय पोहोचवण्याच्या त्याच्या दृढ  समर्पणाला बळकटी देऊन एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  अर्जुन राम मेघवाल यांची सन्माननीय उपस्थिती लाभली, मेघवाल यांनी टेलि-लॉ 2.0 चे उद्घाटन करून ऐतिहासिक घोषणा केली.या आवृत्तीमध्ये न्याय बंधू प्रो बोनो कायदेशीर सेवांसोबत टेली-लॉ सेवांचे  एकत्रीकरण समाविष्ट आहे,कायदेशीर सहाय्यासाठी नागरिकांची सुलभता आणखी वाढविण्यासाठी हे विलीनीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण भारतातील कायदेशीर सेवा सुलभतेचे लोकशाहीकरण करण्यात या कामगिरीने  महत्त्वाची भूमिका बजावली यावर मेघवाल यांनी बोलताना  भर दिला.

राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते टेलि-लॉ आणि न्याय बंधू प्रो-बोनो कायदेशीर सेवा यांच्यातील एकत्रीकरण सुविधेचे  औपचारिक अनावरण झाले.

यासह टेलि-लॉच्या आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती देणारा एक संक्षिप्त चित्रपट आणि एकत्रीकरण  प्रक्रियेचे वर्णन करणारे ई-मार्गदर्शन यांचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. कायदेविषयक  सहाय्य  शोधणारे आणि न्याय बंधू वकिल यांच्यात थेट संबंध प्रस्थापित करण्यासाठी, सर्व नागरिकांना सुलभरीत्या  न्यायाची हमी देणारी गतिशील व्यवस्था वाढवण्यासाठी ही  अखंड एकत्रीकरण सेवा स्थापित करण्यात आली आहे.

राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ग्रामीण स्तरावरील उद्योजक (व्हीएलई ), लाभार्थी आणि तज्ज्ञ  वकील यांच्याशी सूक्ष्म गोष्टींबद्दल संवाद साधत त्यांच्याशी  थेट विचारविनिमय केला. 

***

S.Bedekar/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952316) Visitor Counter : 136


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu