गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

भारतीय स्मार्ट शहरे पुरस्कार स्पर्धा (ISAC) 2022- विजेत्यांची घोषणा

Posted On: 25 AUG 2023 5:00PM by PIB Mumbai

 

नागरिकांना, 'स्मार्ट उपाययोजनां'च्या वापराद्वारे मूलभूत पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि शाश्वत वातावरण तसेच एक सुखावह जीवनमान प्रदान करणे या उद्देशाने 25 जून 2015 रोजी स्मार्ट शहर (सिटी) मिशनची सुरुवात झाली. देशातील शहरी भागात विकासात्मक आदर्श बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट असलेले हे एक परिवर्तनकारी मिशन आहे. SCM अंतर्गत एकूण प्रस्तावित प्रकल्पांपैकी 1,10,635 कोटी रुपये किमतीचे 6,041(76%) प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि 60,095 कोटी रुपये किमतीचे उर्वरित 1,894 प्रकल्प 30 जून 2024 पर्यंत पूर्ण होतील.

सर्व 100 स्मार्ट शहरांमध्ये कार्यरत असलेल्या एकात्मिक आदेश  आणि नियंत्रण केन्द्रांद्वारे (ICCC) मिशनमध्ये सर्वात लक्षणीय टप्पा गाठला गेला आहे. शहरी व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शहरातील कार्यान्वयनाकरता हे ICCC मेंदू आणि मज्जासंस्थेचे काम करत आहेत. गुन्ह्यांचा मागोवा घेणे, नागरिकांची सुरक्षा आणि संरक्षण, वाहतूक व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विविध क्षेत्रात नागरी सेवांमध्ये यामुळे लक्षणीय सुधारणा झाली आहे.

केन्द्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट शहरे (सिटी) मिशन अंतर्गत भारतीय स्मार्ट शहरे पुरस्कार स्पर्धा (ISAC) आयोजित केली जाते.

सुरतमधील स्मार्ट शहरे-स्मार्ट शहरीकरणकार्यक्रमादरम्यान चौथ्या ISAC स्पर्धेला एप्रिल 2022 मध्ये सुरूवात झाली. ISAC 2022 पुरस्कारासाठी दोन-टप्प्यांची अर्ज प्रक्रिया होती. शहराच्या कामगिरीचे एकूण मूल्यांकन समाविष्ट असणारा 'पात्रता टप्पा' आणि स्मार्ट शहरांनी खालीलप्रमाणे सहा पुरस्कार श्रेणींसाठी त्यांचे नामांकन सादर करणे आवश्यक असणारा प्रस्ताव टप्पायांचा यात समावेश होता.:

प्रकल्प पुरस्कार: 10 विविध संकल्पना,

नवोन्मेष पुरस्कार: 2 विविध संकल्पना,

राष्ट्रीय/विभागीय शहर पुरस्कार,

राज्य पुरस्कार,

केन्द्र शासित प्रदेश पुरस्कार आणि

भागीदार पुरस्कार, 3 विविध संकल्पना

पात्रताधारक 80 स्मार्ट शहरांमधून ISAC 2022 साठी एकूण 845 नामांकने प्राप्त झाली. या नामांकनांचे मूल्यमापन 5 टप्प्यात करण्यात आले

महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहराला प्रशासन श्रेणीत स्मार्ट सारथी अॅपसाठी सन्मानीत केले जाईल. पश्चिम विभागातील विभागीय स्मार्ट शहराचा पुरस्कार सोलापूर शहराला जाहीर झाला आहे.

माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते 27 सप्टेंबर 2023 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे ISAC 2022 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला जाईल.

***

S.Bedekar/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952307) Visitor Counter : 182


Read this release in: English , Urdu , Hindi