वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सरकारी ई-मार्केटप्लसने अत्यंत विक्रमी कालावधीत पार केला एक लाख कोटी रुपये सकल व्यापार मूल्याचा टप्पा
जी-ई-एम ने वर्ष 2023-24 मध्ये 145 दिवसांत एक लाख कोटींचा आकडा केला पार; गेल्यावर्षी हा आकडा 243 दिवसांत केला होता पार
Posted On:
23 AUG 2023 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023
वृद्धीला दिलेला वेग, वाढलेली कार्यक्षमता आणि अतूट विश्वास यांच्या बळावर सरकारी ई - मार्केटप्लेस (जी ई एम) ने अत्यंत नेत्रदीपक मैलाचा टप्पा गाठत सकल व्यापारी मूल्यात एक लाख कोटी रुपयांचा व्यवहार चालू आर्थिक वर्षातील 145 दिवसांतच पूर्ण केला आहे.
ही अद्वितीय कामगिरी जी ई एम ची सरकारी खरेदी प्रक्रियेत क्रांतिकारक बदल घडविण्याच्या कटिबद्धतेचे द्योतक आहे . तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत जी ईएम च्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 243 दिवसात पार केला होता. दररोजचा घाऊक व्यापार देखील गेल्यावर्षीच्या 412 कोटी रुपयांच्या तुलनेत, यावर्षी 690 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
या उल्लेखनीय यशामुळे, जीईएम, व्यवहार मूल्य आणि खरेदीदार-विक्रेत्याच्या नेटवर्कची व्याप्ती या दोन्ही बाबतीत, जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या सार्वजनिक खरेदी पोर्टलपैकी एक म्हणून प्रस्थपित करत आहे. स्थापनेपासून, GeM पोर्टलने सकल व्यापार मूल्यात 4.91 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि प्लॅटफॉर्मवर 1.67 कोटी ऑर्डर्सची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
S.Kakade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1951580)
Visitor Counter : 204