उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 महामारीच्या काळातील आरोग्यसेवा कर्मचार्‍यांच्या निःस्वार्थ समर्पणाची उपराष्ट्रपतींकडून प्रशंसा


औषधे माफक दरात मिळावीत यासाठी सर्वांनी अधिक प्रयत्न करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 21 AUG 2023 7:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑगस्ट 2023

 

कोविड-19 महामारीच्या काळात आपल्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांच्या योगदानाचे आणि निःस्वार्थ समर्पणाची उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी प्रशंसा केली आहे. आपले डॉक्टर, परिचारिका आणि निमवैद्यकीय  कर्मचार्‍यांनी आपल्या पारंपरिक मूल्यांचे दर्शन घडवत  आणि स्वतःचा जीवही  धोक्यात  घालून  यातून आपल्याला वाचवले आहे, असे ते म्हणाले.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्लीच्या 48 व्या दीक्षांत समारंभाला आज संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी वैद्यकीय क्षेत्रात उच्च मापदंड प्रस्थापित केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले आणि  सेवेशी असलेली बांधिलकी आणि या संस्थेची कर्तव्याची सखोल जाणीव  सर्वांसाठी अनुकरणीय आहे, असे त्यांनी नमूद केले.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत मार्गदर्शन करताना   धनखड म्हणाले की, "तुमच्याकडे देशांतर्गत आणि देशाबाहेर अनेक मार्ग खुले असतील, परंतु मोठ्या प्रमाणावर लोकांची सेवा करून तुम्हाला जे समाधान मिळेल ते इतर कोठेही मिळणार नाही."

आयुष्मान भारत कार्यक्रमाची प्रशंसा  करताना,या कार्यक्रमाने दुर्बल घटकांना पूर्वी उपलब्ध नसलेले  सुरक्षा कवच दिले आहे, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.  या योजनेने अर्थव्यवस्थेतही मोठा हातभार लावला आहे हे अधोरेखित करून आयुष्मान भारत योजना नसती तर अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाली असती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारताचे जगाचे औषधालय असे वर्णन करताना धनखड यांनी 9400 हून अधिक जनऔषधी केंद्रांचा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला. सर्वसामान्यांना परवडणारी औषधे मिळावीत यासाठी सर्व संबंधितांनी आणखी थोडे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

खूप स्पर्धात्मकतेत अडकल्याबद्दल नापसंती व्यक्त करत,विद्यार्थ्यांनी  त्यांच्या योग्यतेनुसार करिअरचा मार्ग निवडण्याचा सल्ला देत 'तुम्ही देश आणि समाजासाठी मोठे योगदान देऊ शकाल,” असे उपराष्ट्रपतींनी  अधोरेखित केले.

देशातील एम्सची संख्या सात वरून 23 वर गेल्याची प्रशंसा  करताना उपराष्ट्रपतींनी ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे सांगितले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री  डॉ. मनसुख मांडविया, विद्यार्थी, पालक आणि इतर मान्यवर या दीक्षांत समारंभाला उपस्थित होते.

 

 

 

Full text of speech:https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1950854

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1950885)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil