संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण राज्य मंत्र्यांनी दक्षिण कमांडच्या पुणे येथील मुख्यालयाला दिली भेट

प्रविष्टि तिथि: 12 AUG 2023 8:25PM by PIB Mumbai

 

संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी 12 ऑगस्ट 23 रोजी दक्षिण कमांडच्या पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली.

दक्षिण कमांडच्या मुख्यालयात लेफ्टनंट जनरल ए के सिंग, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, आर्मी कमांडर, दक्षिण कमांड यांनी संरक्षण राज्य मंत्र्यांचे स्वागत केले. या वेळी संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांना आत्मनिर्भर भारत अभियानात योगदान  देण्यासाठी  तसेच विविध संस्थांमधील समन्वय आणि तिन्ही सेवादलांमधील एकात्मता वाढविण्यासाठी कमांडने त्याच्या कार्य क्षेत्रात केलेल्या विविध परिचालन, प्रशिक्षण आणि प्रशासन उपक्रमांबद्दल आणि उचललेल्या पावलांबद्दल माहिती देण्यात आली. यासोबतच, राष्ट्र उभारणीसाठी भारतीय लष्कर आणि दक्षिण कमांडचे विशेष योगदान देखील अधोरेखित करण्यात आले. यामध्ये नागरी - लष्करी फ्युजन , विद्यांजली योजनेअंतर्गत शाळा दत्तक घेणे आणि नागरीकांसाठी अमृत सरोवरांची निर्मिती  यावर चर्चा करण्यात आली.

संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी दक्षिण कमांडमधील लष्करी अभियांत्रिकी   सेवेने  बांधलेल्या 2.5 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये लष्करी रुग्णालय, जलतरण तलाव, एक सभागृह, दोन सौर ऊर्जा संयंत्रे आणि एक दारुगोळा साठवण सुविधा यांचा समावेश आहे. या सुविधा कमांडच्या सात वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत.

संरक्षण राज्य मंत्र्यांनी कमांडच्या विविध तुकड्यांशी संवाद साधला आणि राष्ट्राचे सार्वभौमत्व सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोन तसेच उच्च दर्जाच्या कार्यान्वयन तत्परतेबद्दल सर्व श्रेणींचे कौतुक केले. आपल्या  क्षेत्रात विविध मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) मोहिमांमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल त्यांनी कमांडचे अभिनंदन केले. सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला पुढे नेण्यासाठी नागरी संरक्षण उद्योग तसेच संशोधन आणि विकास संस्थांशी संलग्न राहाण्यासाठी सदर्न कमांड करत असलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1948221) आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English