संरक्षण मंत्रालय
पुणे येथे एनडीए चौकाचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2023 5:41PM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 12 ऑगस्ट 2023 रोजी एनडीए चौकाचे लोकार्पण केले. एनडीए चौकात भारतीय लष्कराचा रणगाडा T - 55 , भारतीय हवाई दलाचे मिग - 27 लढाऊ विमान आणि भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजाची छोटी प्रतिकृती मांडण्यात आली आहे. ही युद्धसामग्री राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून उत्तीर्ण होऊन तिन्ही सेवांमध्ये अधिकारी बनणाऱ्या कॅडेट्सच्या कौशल्याचे प्रतीक आहेत. हा एनडीए चौक आपल्या देशाच्या प्रादेशिक अखंडतेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी आपल्या सशस्त्र दलांच्या सामायिक वचनबद्धतेला मूर्त रूप देतो. एनडीए चौक आपल्या सशस्त्र दलांचे महत्व अधोरेखित करतो आणि आपल्या महान राष्ट्राच्या अतूट विश्वासाचा हा दाखला आहे.

***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1948214)
आगंतुक पटल : 129
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English