सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
AYJNISHD(D) मुंबई द्वारे 40 वर्षांची कामगिरी साजरी
Posted On:
09 AUG 2023 9:57PM by PIB Mumbai
मुंबई, 9 ऑगस्ट 2023
अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) AYJNISHD(D) अर्थात अली यावर जंग राष्ट्रीय मूकबधीर आणि कर्णबधीर संस्थेच्या 40 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज केले. विविध रंगीबेरंगी सांस्कृतिक उपक्रमांसह भव्य उद्घाटन सोहोळ्यात भारताच्या विविध भागांतील दिव्यांगजन कर्मचारी आणि विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसह सर्व सहभागींना समावेश आणि संधी प्रदान करण्यात आली. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ही संकल्पना असलेल्या 75 वर्षांच्या कामगिरीच्या अनुषंगाने चार दशकांच्या कामगिरीचे प्रदर्शन, विविध क्षेत्रातील उत्क्रांती आणि प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे वातावरण निर्मितीही झाली.

AYJNISHD(D), ही मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या (DPwD) प्रमुख सर्वोच्च राष्ट्रीय संस्थांपैकी एक आहे.
यावेळी बोलताना ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील तसेच देशातील मूकबधीर आणि कर्णबधीर व्यक्तींच्या समस्या दूर करण्यासाठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सेवा, प्रयत्नांचे कौतुक केले. भारत सरकारच्या या संस्थेने गेल्या 40 वर्षांपासून समाजातील सदस्यांना दिलेल्या अविरत सेवेबद्दल त्यांनी अभिनंदन केले. त्यांनी 10 - 20 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सर्व कर्मचार्यांना पुरस्कृत प्रदान केला आणि AYJNISHD(D) च्या विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, डॉ. हंस, ईसी सदस्य, कॉक्लियर प्रत्यारोपण सर्जन यांनी ‘कॉक्लियर इम्प्लांट: तंत्र आणि तंत्रज्ञानातील बदलत्या कलाचा अंगिकार’ या विषयावर चर्चा केली. या सत्राचे उद्दिष्ट श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी कॉक्लियर इम्प्लांटच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातील अलीकडील वैज्ञानिक कल प्रदान करणे हा आहे.

HP8D.jpeg)
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1947266)
Visitor Counter : 148