अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ल्ड फूड इंडिया-2023 मध्ये सहभागी होण्यासाठी स्थानिक हितधारकांना प्रोत्साहन देण्याच्या उददेशाने अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून नाशिक येथे प्रादेशिक उद्योग संमेलनाचे आयोजन

Posted On: 09 AUG 2023 5:49PM by PIB Mumbai

मुंबई, 9 ऑगस्ट 2023

नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसह  (केसीसीआय I)  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने  मंगळवारी (8 ऑगस्ट, 2023) नाशिक येथे अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रांच्या प्रादेशिक उद्योग संमेलानाचे  आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे 3-5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत  होणार्‍या वर्ल्ड फूड इंडिया 2023 हा या  प्रादेशिक संमेलनाचा मुख्य विषय होता.या भव्य कार्यक्रमात   नाशिकमधील उद्योग हितधारकांचा सहभाग असणार आहे.

या संमेलनाला उपस्थित प्रमुख पाहुणे  अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे  अतिरिक्त सचिव  सनोज कुमार झा यांनी नाशिकच्या अन्न प्रक्रिया उद्योगाच्या हितधारकांशी   संवाद साधला आणि त्यांना वर्ल्ड फूड इंडिया 2023 मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. अन्न प्रक्रिया  उद्योगातील हितधारकांशी  संवाद साधण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी  उत्पादक, अन्न प्रक्रिया करणारे , वाईनवर प्रक्रिया करणारे , उपकरणे उत्पादक, लॉजिस्टिक कंपन्या , शीतसाखळी कंपन्या तंत्रज्ञान प्रदाते , अकादमी, स्टार्ट-अप्स आणि नवोन्मेषक , अन्न किरकोळ विक्रेते इ.सर्व हितधारकांना  एक अनोखे  व्यासपीठ देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे या भव्य खाद्यपदार्थ कार्यक्रमाचे  आयोजन केले जात आहे, असे सनोज कुमार झा यांनी अधोरेखित केले. हा कार्यक्रम मान्यवरांची, जागतिक गुंतवणूकदारांची आणि प्रमुख जागतिक आणि देशांतर्गत खाद्य कंपन्यांच्या व्यावसायिक प्रमुखांची आजवरची सर्वात मोठी परिषद असणार आहे, ही परिषद भारताला जागतिक खाद्यपदार्थांच्या परिदृश्यावर  ठळकपणे आणेल, असे ते म्हणाले.

या संमलेनाला  प्रादेशिक संघटना आणि उद्योगांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अतिशय महत्त्वाच्या प्रादेशिक उद्योग संमेलनात एकूण 70 उद्योग सहभागी झाले होते.

महाराष्ट्र सरकारचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  विवेक सोनवणे यांनी देखील नाशिकस्थित अन्न प्रक्रिया उद्योगांना स्थानिक ते जागतिक दृष्टीकोन प्राप्त करण्याच्या दृष्टीने  वर्ल्ड फूड इंडिया 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे संचालक  संजय कुमार सिंह ; इन्व्हेस्ट इंडियाच्या वरिष्ठ गुंतवणूक विशेषज्ञ राधिका मेहताफिक्कीच्या व्यापार व्यवहार विभागाचे सहसंचालक मयंक रस्तोगी या संमेलनात संवाद साधण्यासाठी उपस्थित होते.

 

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1947163) Visitor Counter : 138


Read this release in: English