आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एबी-पीएमजेएवाय योजनेत संभाव्य घोटाळ्यांच्या तपासणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

Posted On: 08 AUG 2023 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023

आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत (एबी-पीएमजेएवाय) होऊ शकणारे संशयास्पद व्यवहार/ घोटाळ्यांच्या शक्यता तपासण्यासाठी केंद्र सरकार कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तसेच मशीन लर्निंग  या तंत्रज्ञानांचा वापर करत आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान आरोग्यसुविधांच्या बाबतीत होणाऱ्या फसवणुकीला आळा घालणे , त्यांचा शोध तसेच  प्रतिबंध यासाठी या तंत्रज्ञानांचा वापर केला जात असून पात्र लाभार्थ्यांना योग्य उपचार मिळण्याची खात्री बाळगण्यासाठी त्यांची मोठी मदत होत आहे. एआय/एमएल चा वापर करून फसवणूकविरोधी उपाययोजनांची आखणी  तसेच त्यांचा वापर यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारांना नियुक्त करण्यात आले आहे.

दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी प्राप्त माहितीनुसार, या योजनेअंतर्गत एकूण 24.33 कोटी आयुष्मान भारत कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 97,76,594 आयुष्मान भारत कार्डे जारी करण्यात आली आहेत. या योजनेतून जारी करण्यात आलेल्या एकूण आयुष्मान भारत कार्डांचा राज्य/ केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे:

एबी-पीएमजेएवाय योजनेअंतर्गत जारी करण्यात आलेल्या आयुष्मान भारत कार्डांचा राज्य/ केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील

State/UT

Number of Ayushman cards created

Andaman and Nicobar Islands

40,874

Andhra Pradesh

1,31,06,252

Arunachal Pradesh

93,301

Assam

1,60,63,937

Bihar

80,09,790

Chandigarh

1,57,731

Chhattisgarh

2,00,41,832

Dadra and Nagar Haveli & Daman and Diu

4,31,331

Goa

28,431

Gujarat

1,76,63,786

Haryana

85,23,559

Himachal Pradesh

11,35,675

Jammu And Kashmir

82,64,239

Jharkhand

1,12,41,377

Karnataka

1,41,95,295

Kerala

72,48,633

Ladakh

1,34,515

Lakshadweep

26,190

Madhya Pradesh

3,62,18,679

Maharashtra

97,76,594

Manipur

4,89,373

Meghalaya

18,19,920

Mizoram

4,38,471

Nagaland

6,00,519

Puducherry

4,21,796

Punjab

78,60,437

Rajasthan

1,09,49,199

Sikkim

54,875

Tamil Nadu

45,40,231

Telangana

72,36,809

Tripura

13,34,680

Uttar Pradesh

3,00,14,691

Uttarakhand

51,51,774

Total

24,33,14,796

टीप: दिल्ली, ओदिशा आणि पश्चिम बंगाल ही राज्ये/केंद्रशासित प्रदेश एबी-पीएमजेएवाय योजनेची अंमलबजावणी करत नाहीत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा.एस.पी.बघेल यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946798) Visitor Counter : 157


Read this release in: English , Urdu