जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पूर पूर्वानुमान प्रणाली (EWSs)

Posted On: 07 AUG 2023 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) ही देशातील पूराचा अंदाज आणि पूरविषयक आगाऊ सूचना देणारी एक नोडल संस्था आहे. सध्या, सीडब्ल्यूसी 23 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 20 प्रमुख नदी खोऱ्यांचा समावेश असलेल्या 338 अनुमान केंद्रांसाठी (138 प्रवाह अनुमान केंद्रे आणि 200 स्तर अनुमान केंद्रे) पूर अंदाज जारी करते. राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांशी सल्लामसलत करून नेटवर्क उभारण्यात आले आहे. लोकांच्या स्थलांतराबाबत नियोजन आणि इतर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना अधिक वेळ मिळावा म्हणून सीडब्ल्यूसी ने त्याच्या अनुमान केंद्रांवर 5 दिवसांच्या आगाऊ सूचनेसाठी पर्जन्य-ओघ गणितीय प्रारूपावर आधारित खोरेनिहाय पूर अंदाज प्रारूप विकसित केले आहे. सीडब्ल्यूसी द्वारे देखरेख केलेल्या पूर पूर्वानुमान केंद्रांचे राज्यवार वितरण परिशिष्टात दिले आहे.

ही माहिती जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर टूडू यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

परिशिष्ट 

State-wise Flood Forecasting Stations

 

SI.

No.

 

Name of State/UT

 

Number of flood forecasting Stations

 

 

Level

Inflow

Total

1

Andhra Pradesh

10

10

20

2

Arunachal Pradesh

3

1

4

3

Assam

30

0

30

4

Bihar

40

3

43

5

Chhattisgarh

1

2

3

6

Gujarat

6

8

14

7

Haryana

1

1

2

8

Himachal Pradesh

1

0

1

9

Jammu & Kashmir

3

0

3

10

Jharkhand

2

15

17

11

Karnataka

1

14

15

12

Kerala

4

2

6

13

Madhya Pradesh

2

12

14

14

Maharashtra

8

14

22

15

Odisha

12

7

19

16

Rajasthan

4

11

15

17

Sikkim

3

5

8

18

Tamil Nadu

4

11

15

19

Telangana

5

9

14

20

Tripura

2

0

2

21

Uttar Pradesh

39

5

44

22

Uttarakhand

4

4

8

23

West Bengal

12

4

16

24

Daman & Diu

I

0

1

25

NCT of Delhi

2

0

2

 

Total

200

138

338

 

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1946536) Visitor Counter : 128


Read this release in: English , Urdu