कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
प्रवासी कौशल विकास योजनेंतर्गत 1 लाख 29 हजार लोकांना परदेशात स्पर्धात्मकतेसाठी सुसज्ज बनवणाऱ्या सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण
Posted On:
07 AUG 2023 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2023
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालया अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, प्रवासी कौशल विकास योजनेअंतर्गत (PKVY) संभाव्य स्थलांतरितांना एक दिवसीय प्री-डिपार्चर ओरिएंटेशन ट्रेनिंग (PDOT) देत आहे. स्थलांतरितांना परदेशी गंतव्यस्थानी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल्सनी सुसज्ज करणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षणात भाषा, संस्कृती, स्थलांतर प्रक्रिया, कल्याणकारी उपाय आणि गंतव्य देशात काय करावे आणि करू नये अशा विविध पैलूंबाबत माहिती देण्यात येते. 8 तासांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवाराला प्रमाणपत्र देण्यात येते. जानेवारी 2018 पासून 31 मे 2023 पर्यंत एकूण 1,29,062 उमेदवारांनी, प्रवासी कौशल विकास योजनेअंतर्गत अंतर्गत प्री-डिपार्चर ओरिएंटेशन प्रशिक्षण घेतले आहे.
विविध देशांमध्ये नोकऱ्या मिळालेल्या प्री-डिपार्चर ओरिएंटेशन (PDO) प्रशिक्षित व्यक्तींची आकडेवारी मंत्रालय ठेवत नाही.
कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1946502)
Visitor Counter : 168