विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यासंदर्भातील विधेयक केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडून लोकसभेत सादर
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2023 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन अर्थात अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना करण्यासाठी लोकसभेत विधेयक सादर केले.
विधेयक सादर करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, संसदेने मंजूर केल्यावर हा कायदा गणितीय विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि पृथ्वी विज्ञान, आरोग्य आणि कृषी यासह नैसर्गिक विज्ञान क्षेत्रातील संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी उच्च स्तरीय धोरणात्मक दिशा प्रदान करेल.
अशा संशोधनासाठी आणि त्याच्याशी संबंधित किंवा प्रासंगिक बाबींसाठी प्रोत्साहन, देखरेख आणि पाठबळ प्रदान करण्यासाठी मानवता आणि सामाजिक विज्ञानांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक सन्मुखतेला देखील प्रोत्साहन दिले जाईल, असे सिंह यांनी सांगितले.
संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) च्या शिफारशींनुसार देशातील वैज्ञानिक संशोधनाची उच्च-स्तरीय धोरणात्मक दिशा प्रदान करण्यासाठी एनआरएफ(राष्ट्रीय संशोधन संस्था ) ही सर्वोच्च संस्था स्थापन करेल, ज्यासाठी एकूण अंदाजित खर्च पाच वर्षांत (2023-28) 50,000 कोटी रुपये असेल.
* * *
S.Kakade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1945878)
आगंतुक पटल : 142