संरक्षण मंत्रालय

रिअर अ‍ॅडमिरल अजय डी थिओफिलस यांनी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग गोवा एरिया म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 01 AUG 2023 8:15PM by PIB Mumbai

पणजी, 1 ऑगस्ट 2023

रिअर अ‍ॅडमिरल अजय डी थिओफिलस यांनी आयएनएस हंसा, गोवा येथे आयोजित सेरेमोनियल परेडमध्ये फ्लॅग ऑफिसर कमांडिंग गोवा एरिया (FOGA) म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी भारतीय नौदल अकादमीचे उप कमांडंट म्हणून काम पाहिले आहे.

01 जुलै 1991 रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्त झालेले, रिअर अ‍ॅडमिरल अजय डी थिओफिलस यांची जून 1992 मध्ये पायलट अभ्यासक्रमासाठी निवड झाली आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ते नौदल विमानवाहूच्या लढाऊ प्रवाहात सामील झाले.

त्यांनी किरण, HPT-32, मिग-21, सी हॅरियर आणि मिग-29K विमानांचे सारथ्य केले आहे आणि त्यांना 3,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. आयएनएस विक्रमादित्यवर MiG-29K उतरवणारे ते पहिले भारतीय पायलट होते. त्यांनी 2001 मध्ये फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्स अभ्यासक्रम पूर्ण केला असून ते सी हॅरियर आणि मिग-29K विमानांचे प्रशिक्षक आहेत.

MiG-29K प्रकल्पाचे प्रमुख म्हणून रिअर अ‍ॅडमिरल थिओफिलस यांची निवड करण्यात आली आणि रशियामध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्क्वाड्रनचे नेतृत्व केले आणि नंतर आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकासोबत संयुक्तरित्या स्क्वाड्रनचे नेतृत्व केले. त्यांनी आयएनएस विक्रमादित्यचे कॅप्टन (एअर) म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या कमांडच्या कार्यकाळात आयएनएस त्रिंकट, तलवार आणि तर्कश यांचा समावेश आहे.

 

PIB Panaji/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa(Release ID: 1944826) Visitor Counter : 128


Read this release in: English