कृषी मंत्रालय
पीएम किसान योजनेच्या, महाराष्ट्रातील लाभार्थ्यांकडे 5000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली
महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात पीएम किसान योजनेचे लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही बांगलादेशी नागरिकाच्या अर्जाची नोंदणी करण्यात आलेली नाही “ केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
Posted On:
01 AUG 2023 8:00PM by PIB Mumbai
मुंबई/नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान)योजनेच्या सुरुवातीपासून या योजनेतून महाराष्ट्रातील लाभार्थ्यांकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या निधीचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:-
अनुक्रमांक
|
आर्थिक वर्ष
|
महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना देण्यात आलेला निधी
(कोटी रुपयांमध्ये)
|
1.
|
2018-19
|
436.815
|
2.
|
2019-20
|
4,898.806
|
3.
|
2020-21
|
6,671.801
|
4.
|
2021-22
|
6,431.384
|
5.
|
2022-23
|
5,654.625
|
विनायक राऊत आणि संजय जाधव यांनी लोकसभेत विचारलेल्या बिगर-तारांकित प्रश्नाच्या उत्तरादखल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
महाराष्ट्रात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पीएम-किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही बांगलादेशी नागरिकाचा अर्ज नोंदवून घेण्यात आलेला नाही अशी माहिती देखील केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच, महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे कुडाळच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (महसूल विभाग) अध्यक्षतेखाली या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, पीएम-किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील कुडाळ तालुक्यात दिगस या गावी कोणत्याही बांगलादेशी नागरिकाने अर्ज सादर केलेला नाही अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान)योजना ही केंद्रीय क्षेत्रातील सर्वात मोठी योजना असून देशातील भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना लागू करण्यात आली. उच्च उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत, दर वर्षी 6000 रुपयांचा आर्थिक निधी तीन समान भागांमध्ये विभागून शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो.आतापर्यंत देशभरातील 11 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेतून 2.60 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरीत करण्यात आली आहे. पीएम-किसान योजनेचा लाभ केवळ भारताचे नागरिक असलेल्या शेतकऱ्यांनाच देण्यात येतो.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1944819)
Visitor Counter : 94