कृषी मंत्रालय

कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी वर्ष 2025-26पर्यंत 8460 कोटी रुपयांची तरतूद


भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक उत्तम आणि उपयुक्त कृषी पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना मंजुरी

Posted On: 01 AUG 2023 7:38PM by PIB Mumbai

मुंबई/नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023

कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी ॲग्री इन्फ्रा फंड (AIF) याअंतर्गत वर्ष 2025-26 पर्यंत 1 लाख कोटी रुपये इतक्या एकूण वाटपांपैकी 8460 कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्र राज्याला तात्पुरती देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही योजना वर्ष 2020 पासून संपूर्ण भारतात कार्यान्वित करण्यात आली असून पात्र प्रकल्पांसाठी पात्र शेतकऱ्यांसह लाभार्थ्यांना मध्यम ते दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. एआयएफ योजनेद्वारे जिल्हानिहाय निधीवाटप प्रदान केले जात नाही.ही पायाभूत सुविधा युनिट्स म्हणजे प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, गोदामे, कोल्ड स्टोरेज आणि कोल्ड चेन, वर्गीकरण आणि ग्रेडिंग युनिट्स इत्यादी प्रकारच्या  शेतीसाठी उपयुक्त  आणि उत्तम पायाभूत सुविधा देणारी केंद्रे आहेत.

महाराष्ट्रातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मंजूर झालेल्या एआयएफ प्रकल्पांचे तपशील पुढे दिले आहेत:

Details of Projects Sanctioned in the District of Bhandra, Maharashtra

S.no

Particulars

No

Amount

(in Crore)

1

Warehouse

17

11

2

Primary processing Centre

11

5

3

Sorting & Grading Unit

8

5

4

Infrastructure for smart and precision agriculture

1

1

 

Total

37

22

* Data as per portal as on 25.07.2023

   
       

Details of Projects Sanctioned in the District of Gondia, Maharashtra

S.no

Particulars

No

Amount

(in Crore)

1

Primary processing Centre

26

23

2

Warehouse

14

5

3

Cold Stores and Cold Chain

1

4

4

Sorting & Grading Unit

3

2

 

Total

44

33

* Data as per portal as on 25.07.2023

   
         

 

 

 

 

 S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1944815) Visitor Counter : 300


Read this release in: English